शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यात तिरंगी लढती

By admin | Updated: February 15, 2017 04:47 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे मतदान २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. कर्जत तालुक्यात सहा जिल्हा परिषदेचे व बारा पंचायत

विजय मांडे / कर्जतजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे मतदान २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. कर्जत तालुक्यात सहा जिल्हा परिषदेचे व बारा पंचायत समितीचे प्रभाग आहेत. उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी १११ उमेदवारांपैकी ४४ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. यामुळे जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी २१, तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ४६ असे एकूण ६७ उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत. अखेरच्या क्षणी युत्या, आघाड्या स्पष्ट झाल्या. या निवडणुकीत बोटावर मोजण्याइतके अपक्ष उमेदवार आहेत. मात्र, त्यापैकी एकही उमेदवार ‘पॉवरफुल’ वाटत नाही. त्यामुळे बहुतांश ठिकाणी तिरंगी लढती होणार आहेत.या निवडणुकीत पनवेल महापालिका झाल्याने जिल्हा परिषदेच्या प्राभाग रचनेत बदल झाले व कर्जत तालुक्यात सहा जिल्हा परिषद प्रभाग आणि १२ पंचायत स्ािमती प्रभाग झाले. ६७ उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. सर्वांना निवडणुकीचे वाटप झाल्याने आता सर्व उमेदवार प्राचाराच्या रणधुमाळीत सामील झाले आहेत.सुरु वातीला शिवसेना स्वबळावर निवडणूक लढविणार, अशा वल्गना त्यांचे पदाधिकारी करत होते; परंतु अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शिवसेनेने पक्षाकडून उमेदवारी दिलेले अर्ज काढून घेतल्याने शिवसेना व काँग्रेस युती झाल्याचे स्पष्ट झाले. भाजपाने आरपीआयशी जुळवून घेऊन दहिवलीतर्फे वरेडीमधील केवळ एक पंचायत समितीची जागा देऊन त्यांची बोळवण केली. शिवाय त्या उमेदवाराला पक्षाचा एबी फॉर्म वेळेवर न मिळाल्याने त्यालाही अपक्ष पण भाजपा, आरपीआय पुरस्कृत म्हणून पक्षाच्या निशाणीशिवाय निवडणूक लढवावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या सहापैकी पाच ठिकाणी तिरंगी, तर केवळ बीड बुद्रुकमध्ये पंचरंगी लढत होणार आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, बसपा आणि कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार उभे आहेत; परंतु खरी लढत राष्ट्रवादीचे सुधाकर घारे व शिवसेनेचे मनोहर थोरवे यांच्यामध्ये होईल. विशेष म्हणजे, उमरोली सारख्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या जिल्हा परिषद प्रभागात शिवसेनेचा उमेदवार उभा नाही त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, एमएमआयचा एक उमेदवार शेलू पंचायत समितीमधून उमेदवारी लढवीत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांची बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीबरोबर आघाडी आहे. या सर्वांचे भवितव्य काय? हे २३ फेब्रुवारीला ठरेल.