शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पोलादपूरमध्ये नगराध्यक्षाच्या गाडीवर पडले झाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:13 IST

नीलेश सुतार बचावले : सडवली आदिवासी वाडीमध्ये पावसात दोन घरांचे नुकसान

पोलादपूर : सोमवारी पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावल्याने झाडांच्या मुळांचा आधार सुटून झाडे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी दुपारी सव्वा एक वाजता पोलादपूर नगरपंचायत इमारतीजवळील सागाचे झाड अतिवृष्टीने नगराध्यक्ष नीलेश सुतार यांच्या मोटारसायकलवर कोसळले. दैव बलवत्तर म्हणून नगराध्यक्ष बचावले तर तालुक्यातील सडवली आदिवासी वाडी येथील दोन घरे पडली असल्याची माहिती प्राप्त झाली असून घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे.

सोमवारी सकाळपासून पावसाने जोर धरला असून तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यातील पावसाचा जोर कायम असून सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे नगराध्यक्ष नीलेश सुतार हे गाडी लावून नगरपंचायतीमध्ये कामकाज पाहण्यासाठी आले होते. आपल्या कार्यालयात जाऊन आसनस्थ होत असताना अचानक बाहेर जोराचा आवाज झाला म्हणून सर्व कर्मचारी व नगराध्यक्ष बाहेर आले, तेव्हा झाड त्यांच्या गाडीवर कोसळले होते. नगराध्यक्ष नीलेश सुतार हे तेथे नसल्यामुळे त्यांना कोणतीहीइजा झाली नाही, मात्र त्यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे.

तर दुपारी सडवली आदिवासी वाडी येथे दोन घरांचे नुकसान झाले आहे. यापैकी किसन शिवराम कोळी यांच्या घराची भिंत कोसळली आहे तर किसन काळू पवार यांनी घराचे पत्र काढून ठेवले होते मात्र त्यांच्या घराची भिंत कोसळली. किसन कोळी कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने घरात कोणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.सडवली येथील तलाठी महाडिक यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पंचनामा करण्यात येणार असून अंदाजे ५० ते ५५ हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.