शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कशेडी घाटात वाहतूक सुरळीत

By admin | Updated: November 16, 2015 02:19 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात शनिवारी सकाळी एलपीजी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरला अपघात झाला होता

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात शनिवारी सकाळी एलपीजी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरला अपघात झाला होता. यामुळे टँकर कलंडल्याने वायुगळती होत होती. ही वायुगळती चोवीस तासानंतर थांबविण्यात यश आले आहे.अपघातानंतर शनिवारी महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी तुळशी खिंड, विन्हेरे महाड, राजेवाडी, काटेतळी, नागाव अशी पर्यायी मार्गाने वळविली होती. पोलिसांना खेड लोटे येथून औद्योगिक वसाहतीतील विनीती आॅरगॅनिक कंपनीतील वायुरोधक पथकास पाचारण करून काही अंशी वायुगळती थांबविण्यात यश मिळवले. मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी उरण येथील भारत गॅस कंपनीच्या वायुरोधक पथकास पाचारण केले. हे पथक रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने अथक परिश्रमानंतर वायुगळती थांबविण्यात यश मिळवले.या वायुरोधक पथकामध्ये भारत गॅस कंपनीचे आॅपरेशन सेक्शन अधिकारी आनंद राऊत, असिस्टंट अधिकारी मनोज पाटील, कृष्णा कडू, दयाराम पाटील, अमोल कांबळे, जॉन राजे अशा सहा जणांचा समावेश होता. अपघातग्रस्त टँकरमधील द्रवरूप वायू रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्टिंग करण्यात या पथकाला यश आल्याने मोठी दुर्घटना टळली असून महामार्ग पोलीस व खेड पोलीस प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. तब्बल २४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले असून रविवारी सकाळी १० वाजता कशेडी घाटातील महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आल्याचे महामार्ग कशेडी टॅपचे एएसआय माने यांनी सांगितले.कशेडी घाटात अनेक वेळा लहान-मोठे अपघात होतात. यामुळे येथे वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागतो. (वार्ताहर)