शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:37 IST

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घरात अडकलेले नागरिक आता बाहेर पडू लागले आहेत.

निखिल म्हात्रेअलिबाग :  सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रायगडच्या किनारपट्टीसह धार्मिक स्थळेही सज्ज झाली आहेत. पाली येथील बल्लाळेश्वर व महड येथील वरद-विनायकाच्या दर्शनासाठी भक्तांची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहावयास मिळते. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने आधीच खबरदारी घेतली आहे. तर पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबाग, नागाव, रायवाडी, वरसोली मुरुड आवास आदी ठिकाणच्या हॉटेल्सची बुकिंग एक महिना आधीच फुल्ल आहेत. त्यामुळे आयत्या वेळी पर्यटनासाठी  आलेल्या पर्यटकांचा मात्र हिरमोड झाला.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घरात अडकलेले नागरिक आता बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे जिल्हा आता भरून गेला आहे. मागील सात दिवस पर्यटक जिल्ह्यातील विविध पर्यटन व धार्मिकस्थळांवर वास्तव्यास आहेत. तर ऐनवेळी येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ शकते, तसेच त्यांना मनमानी पॅकेज घ्यावे लागू शकते. याचीही काही ठिकाणी आधीच दखल घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे कौटुंबिक पर्यटनावरच येथे जास्त भर आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, कोशिद, श्रीवर्धन तालुक्यांतील किनारपट्टीवर नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. साधारण एक ते दीड लाख पर्यटक चार ते पाच दिवसांत जिल्ह्याच्या किनारपट्टीला भेट देतात. यात सर्वाधिक पसंती नागाव, मुरुड, काशीद या ठिकाणांना असते. महिनाभर आधीच बहुसंख्य हॉटेलचे बुकिंग फुल्ल झालेले आहे. याआधी एका रात्रीसाठी सर्वाधिक पॅकेज १० हजार रुपये असायचे. मात्र यामध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ते बुकही झाले आहेत. 

छोटीमोठी हॉटेलही हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे. अलिबाग, नागाव आक्षी, किहीम, आवास, सासवणे, काशीद, दिव्याआगर, श्रीवर्धन याबरोबरच किनारपट्टीलगतच्या गावांतही निवासव्यवस्था उपलब्ध असून बहुतेक ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने बुकिंग झाल्याची माहिती आहे. पर्यटन व्यावसायिकांनी पॅरासिलिंग, बनाना राइड, स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग असे प्रकार पर्यटकांसाठी यापूर्वीच खुले केले आहेत.

पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता स्थानिक केटरर्स, खाणावळी यांचीही लगबग सुरू आहे. मोदक, डाळ-भात, पुरणपोळी अशा शाकाहारी पदार्थांबरोबरच मटणवडे, कोंबडीवडे तसेच ताज्या माशांपासून बनविलेले विविध पदार्थ अशा खास कोकणातील रुचकर आहाराची उपलब्धता करून पर्यटकांची हौस भागविली जाणार  आहे.