शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वडवली येथे दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 01:07 IST

नेरळ पोलीसठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल

नेरळ : वडवली गावातील बौद्धवाडामधील दोन गटांत किरकोळ वादातून हाणामारी झाली. त्यात लाकडी दांडके आणि लोखंडी सुरीमुळे हाणामारीत काही जण जखमी झाले आहेत.

नेरळ-कर्जत रस्त्यावर असलेल्या वडवली गावातील अनंत हरिचंद्र सोनावणे हे १० एप्रिल रोजी सायंकाळी आपल्या घराच्या गच्चीवर उभे असताना त्यांना शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील काही जण फिर्यादीसह गेले असता त्यांना लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली, तर दोन महिलांना शिवीगाळ करण्यात आली. त्याचा राग आल्याने लाकडी दांडक्याने मारहाण झालेले सोनावणे कुटुंबाने आपल्या अंगणातून जाताना प्रेम मनोहर सोनावणे आणि अन्य आठ लोकांना यांना प्रथम शिवीगाळ आणि नंतर मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी पुढे आलेल्या तिघांवर सुरीने वार केले असून यात दोघे जखमी झाले आहेत. तर काहींना बेंजोचे लोखंडी स्टॅण्ड यांच्या साहाय्याने मारहाण करण्यात आल्याने ते जखमी झाले आहेत. वडवली गावातील हाणामारीची फिर्याद अनंत हरिचंद्र सोनावणे आणि प्रेम मनोहर सोनावणे यांनी दिली असून नेरळ पोलीसठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंद केलेआहेत.

अनंत सोनावणे यांनी दिलेल्या फिर्यादीत सुभाष धाऊ सोनावणे, प्रेम मनोहर सोनावणे, सिद्धार्थ भीमराव सोनावणे, उज्ज्वल सुभाष सोनावणे, संभाजी धाऊ सोनावणे, सुजाता सुभाष सोनावणे आणि अरुणा मनोहर सोनावणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.जखमींवर सरकारी रु ग्णालयात उपचारप्रेम मनोहर सोनावणे यांच्या फिर्यादीत सूर्यकांत गायकवाड, उमेश गायकवाड, नीलेश गायकवाड, राजेश गायकवाड, रतन गायकवाड, मिलिंद गायकवाड, तानाजी गायकवाड, संदीप गायकवाड यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या मारहाण प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली. पुढील तपास सुरू असून जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे जाधव यांनी सांगितले.