शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी, मार्गावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 03:53 IST

प्रवासी त्रस्त : जिते, गोविर्ला फाटा, आंबिली फाटा, हमरापूर, रामवाडी मार्गावर खड्डेच खड्डे

वडखळ : मुंबई-गोवा महामार्गावर सातत्याने वाहतूककोंडी होत आहे. खड्डेमय रस्ते, रुंदीकरणाच्या कामांमुळे प्रवासात विलंब होत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या नऊ वर्षांपासून सुरू आहे. गेल्या वर्षभरात महामार्गाची पुरती वाट लागली असून, ठेकेदार बदलल्यापासून कामाचा दर्जा पूर्णपणे खालावला आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे.

विशेषत: जिते, गोविर्ला फाटा, आंबिवली फाटा, हमरापूर फाटा, इरवाडी, रामवाडी पूल, उंबर्डे फाटा ते वडखळपर्यंत खड्डेच खड्डे आहेत. सध्या खड्डे भरण्याचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी ऐकेरी वाहतूक सुरू आहे. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवून खड्डे भरले असले तरी पेव्हर ब्लॉक लेवलमध्ये नसल्याने तेथून प्रवास करतानाही प्रवाशांना त्रासहोतो. दुचाकीस्वारांना पेव्हर ब्लॉकवरून गाडी नेताना कसरत करावी लागते. महामार्गावर पेणजवळ भोगावती नदीवर नवीन पूल बांधण्यात आला आहे; परंतु या पुलाला वर्ष होत नाही तोच मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याने कोंडी होत आहे. तरणखोप बायपास ते अंतोरा फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

खड्डे भरण्याच्या कामाचा वेग व कामाचा दर्जा पाहता हा रस्ता कधी सुस्थितीत येणार, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे तर भोगावती नदीवरील पुलावरही खड्डे पडले असून या पुलावरील खड्डे ‘जैसे थे’ आहेत. आता सणासुदीचे दिवस असल्याने महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे; परंतु भोगावती पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कायमच वाहतूककोंडी होत आहे. गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यापूर्वी तरी महामार्गावरील खड्ड्यांचे हे विघ्न दूर होईल का? असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.

टॅग्स :RaigadरायगडTrafficवाहतूक कोंडी