शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

माथेरान राणीच्या प्रतीक्षेत पर्यटक

By admin | Updated: June 2, 2016 01:30 IST

मिनीट्रेनमधून प्रवास करता यावा यासाठी प्रत्येकाचा अट्टाहास असतो. सर्वच पर्यटक हे सुट्यांच्या हंगामात येथे आवर्जून भेट देत असतात. परंतु ऐन गर्दीच्या वेळी या गाडीचे तिकीट उपलब्ध होत

माथेरान : मिनीट्रेनमधून प्रवास करता यावा यासाठी प्रत्येकाचा अट्टाहास असतो. सर्वच पर्यटक हे सुट्यांच्या हंगामात येथे आवर्जून भेट देत असतात. परंतु ऐन गर्दीच्या वेळी या गाडीचे तिकीट उपलब्ध होत नसल्याने अनेकांचा भ्रमनिरास होताना दिसतो. मात्र ही मिनीट्रेनच बंद असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे.उन्हाळी शेवटच्या सुट्यांच्या हंगामात अनेक जण खासकरून मिनीट्रेनची डोंगर दऱ्यामधील सफरीची अनुभूती घेण्यास आले असता दोनदा या गाडीची बोगी घसरली होती. त्यामुळे ही सेवा बंद करण्याचा कठोर निर्णय रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे स्थानिक व पर्यटकांंच्या सोयीसाठी येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला. तेव्हा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी अमनलॉज ते माथेरान स्टेशनपर्यंत शटल सेवा सुरू होण्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे. याबाबतीत दोनदा चाचणी देखील घेण्यात आली आहे. परंतु रेल्वे सुरक्षा आयुक्त स्वत: ही चाचणी घेणार असल्याने अजून तरी आठवडा लागणार आहेच, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून प्राप्त झाली. गाडी सुरू नाही हे पर्यटक व स्थानिकांसाठी दुर्भाग्यच म्हणावे लागेल. यामुळे स्थानिकांच्या व्यवसायावर थोडा परिणाम होत आहे. मात्र हरित महोत्सवाने पर्यटकांना आकर्षित केल्यामुळे स्थानिकांची आर्थिक उणीव काहीशा प्रमाणात भरून काढली असल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले. नवखे पर्यटक स्टेशनवर येऊन येथे दिमाखात उभ्या असणाऱ्या शतकी पार केलेल्या कोळशाच्या इंजिनजवळ उभे राहून फोटो काढून मिनीट्रेनची हौस भागवत आहेत. (वार्ताहर)