शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

रायगडमध्ये पर्यटकांनी बहरले समुद्रकिनारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 01:06 IST

‘मजा करा पण नियमांचे पालन करा’; दिघी सागरी पोलीस, दिवेआगर ग्रामपंचायत सज्ज; लॉजिंग, हॉटेल हाऊसफुल्ल

बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन समुद्रकिनारी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागताला गोवा समुद्र किनाऱ्यापेक्षा आता रायगडच्या किनाºयाला मौजमजा करण्यासाठी पर्यटकांनी पसंती दिल्याचे दिसून येत आहे. २७ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत दिवेआगर येथील लॉजिंग, रिसोर्ट हाऊसफुल्ल असल्याचे चित्र आहे; तर दिवेआगर हे सर्वसामान्य वर्गातील येणाºया पर्यटकांना परवडेल अशा दरामध्ये व रुचकर जेवणासाठी प्रसिद्ध असल्याने या वेळी पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने समुद्रकिनारी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस बंदोबस्तदेखील मागविण्यात आला आहे. रात्रभर मजा करा; पण नियमांचे पालन करा, असा इशाराही सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी दिला आहे. दिवेआगर ग्रामपंचायतीनेदेखील पर्यटकांना आनंद लुटता यावा यासाठी समुद्रकिनारी स्वच्छतेबरोबरच, लाईट्सची व्यवस्था के ली आहे.३१ डिसेंबर म्हटले की, समुद्रकिनारी जाऊन मौजमजा करीत नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा बेत आज तरुणाईसह कुटुंबेदेखील करतात. सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरी भागातील नागरिकांनी श्रीवर्धनमध्ये जाण्याचा बेत आखला आहे.पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापूर आदी भागांतून हजारो पर्यटक व सहली येत आहेत. दिघी येथून जंजिरा किल्ला त्याचप्रमाणे हरिहरेश्वराचे दर्शन, सुवर्ण गणेश दर्शन व श्रीवर्धन व दिवेआगर किनारी मनसोक्त मजा करण्यासाठी दिवेआगर पर्यटकांनी हाऊसफुल झाले आहे.अचानक बेत आखलेल्या काही पर्यटकांना दिवेआगर येथे राहण्यासाठी खोल्या उपलब्ध न झाल्याने बोर्ली, वेळास, शिस्ते येथे आसरा घ्यावा लागत आहे. २०१९ च्या अखेरचा शनिवार-रविवार व ३१ डिसेंबरच्या स्वागतासाठी दिवेआगरमध्ये लॉजिंग हाउसफुल्ल झाल्याचे चित्र आहे.जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात आला असून समुद्रकिनारी तसेच दिवेआगरच्या आसपासच्या महत्त्वाच्या गावांत पोलीस तैनात राहणार आहेत. मद्य प्राशन करून गाडी चालविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. रात्रभर मजा करताना कोणत्याही प्रकारे नियमांचा भंग होणार नाही व कोणासही त्रास होणार नाही याची दक्षता बाळगावी.- महेंद्र शेलार, पोलीस निरीक्षक, दिघी सागरी पोलीस ठाणे