शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:33 IST

वर्षभरात ८८ हजार पर्यटकांची हजेरी; पक्षी अभ्यासकांना भुरळ

- वैभव गायकरपनवेल : मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून अवघ्या १२ किलोमीटरवर कर्नाळा अभयारण्य आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने संपन्न असल्याने महाराष्ट्र शासनाने हा परिसर राखीव वनक्षेत्र घोषित करून पक्षी अभयारण्याचा दर्जा दिला आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. वर्षभरात जवळपास ८८ हजार पर्यटकांनी कर्नाळा अभयारण्याला भेट दिली असून, यात विदेशी पर्यटकांसह पक्षितज्ज्ञांची संख्या मोठी आहे. कर्नाळा अभयारण्यात ६४२ वृक्ष प्रजाती, वेली, वनौषधी आणि दुर्मीळ वनस्पती अस्तित्वात आहेत. पक्षी निरीक्षणाशिवाय अभयारण्यातील मुख्य आकर्षण कर्नाळा किल्ला आहे. पर्यटकांसाठी या ठिकाणी निवासाची व्यवस्था आहे.स्थानिक, स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर१२.१५५ चौरस किलोमीटरच्या परिसरात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. कर्नाळा अभयारण्य म्हणजे स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर मानले जाते. या ठिकाणी विविध प्रजातीचे १४७ पक्षी आढळत असून, त्यातील ३७ प्रजातीचे पक्षी स्थलांतरित किंवा प्रवासी पक्षी आहेत. मध्य आशिया, युरोप, उझबेकिस्तान, सैबेरियातून या ठिकाणी मोठ्या संख्येने पक्षी येत असल्याने पक्षी अभ्यासक सांगतात.जंगली प्राण्यांचाही वावरदेशी-विदेशी प्राण्यांसह बिबटे, बेकर, रानडुक्कर, साळिंदर, रानमांजर आदी दुर्मीळ प्राणी आढळतात.पावसाळ्यात विशेष आकर्षणपावसाळ्यात ट्रेकर्स किल्ला तसेच अभयारण्य परिसरास मोठ्या संख्येने भेट देतात. राखीव वनक्षेत्र घोषित असल्याने प्लॅस्टिक बॉटल्स, पिशव्या नेण्यास प्रतिबंध असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.