शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली धरणावर पर्यटकांची तुफान गर्दी

By admin | Updated: July 25, 2016 03:04 IST

मुरु ड शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आंबोली धरण असून, या धरणावर वर्षा सहलीसाठी पर्यटकांची तुफान गर्दी पाहावयास मिळत आहे.

नांदगाव/ आगरदांडा : मुरु ड शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आंबोली धरण असून, या धरणावर वर्षा सहलीसाठी पर्यटकांची तुफान गर्दी पाहावयास मिळत आहे. सुमारे २९ कोटी रु पये खर्च करून पिण्याच्या पाण्याकरिता व सिंचन उपयोगासाठी हे धरण बांधण्यात आले. सुमारे पाच किलोमीटर क्षेत्रात धरणाच्या पाण्याची व्याप्ती आहे. या धरणाचे ओव्हरप्लो पाणी चौकोनी हौदात पडून मग ते पाणी वाहून जाते. याच ठिकाणी पर्यटक मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटत आहेत.यंदा मुरु ड तालुक्यात २४०० मिलीमीटर एवढा पाऊस पडल्याने नद्या, नाले व असणारी धरणे ओसंडून वाहत आहेत. ओव्हरफ्लो पाण्याचा पर्यटक मनमुराद आनंद घेत असून महिला, पुरु ष व बच्चेकंपनी यात सहभागी झालेले दिसून येते. परिसर खूप मोठा असल्याने पर्यटक स्वत:सोबत भोजन बनवण्याचे साहित्य आणून जेवण सुद्धा या भागात बनवत असल्याचे पाहावयास मिळत आहे, तर काही पर्यटक पार्सल भोजन आणताना दिसत होते. धरण्याच्या या पाण्यात खूप मौजमजा करीत असून, आता हळूहळू या भागात छोटी छोटी दुकाने थाटलेली पाहावयास मिळत आहेत. भाजलेले कणीस तसेच तत्सम पदार्थ सुद्धा मिळत आहेत. मुंबई, नाशिक, कल्याण, बोरीवली, ठाणे व स्थनिक नागरिकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. हे धरण खार-आंबोली ग्रामपंचायतअंतर्गत येत असून, ग्रामपंचायत सरपंच मनोज क्र माने म्हणाले की, हे धरण जलसंपदा विभागाच्या ताब्यात असून पर्यटकांना ते कोणतीही सुरक्षितता पुरवीत नाही. या धरणाचा परिसर ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिला, तर आम्ही सुरक्षारक्षक तसेच धरण परिसरातील स्वछता, चेंजिंग रूम सेवा तातडीने पुरवू. वाहनतळासाठी जागा देऊन पर्यटकांना सुविधा देऊ, असे सांगून तशी मागणी सुद्धा जलसंपदा विभागाकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या धरणावर प्रचंड गर्दी पाहावयास मिळत असून, शनिवार व रविवार या दोन दिवसांत हजारो पर्यटक पाहावयास मिळत आहेत. (वार्ताहर)