शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग आगारात पर्यटकांची तुफान गर्दी; परतीच्या प्रवासात एस टी विभागाचे नियोजन कोलमडले

By राजेश भोस्तेकर | Updated: January 1, 2024 18:32 IST

पर्यटकांच्या गर्दीच्या दृष्टीने एस टी विभागाचे नियोजन ठेपाळले होते. 

अलिबाग : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि २०२४ नव वर्षाच्या स्वागतासाठी अलिबागमध्ये हजारो पर्यटक शनिवारी दाखल झाले होते. नववर्षाचे स्वागत करून पर्यटक हे सोमवारी १ जानेवारी २०२४ ला माघारी फिरले. मात्र जाताना पर्यटकांचे मोठे हाल पाहायला मिळाले. अलिबाग एस टी आगारात बसला तुफान गर्दी पर्यटक प्रवाशाची झाली होती. अलिबाग आगारात येणाऱ्या अनेक बसेस ह्या वाहतूक कोंडीत अडकल्याने पर्यटकांना बसची वाट पाहत ताटकळत राहावे लागले होते. पर्यटकांच्या गर्दीच्या दृष्टीने एस टी विभागाचे नियोजन ठेपाळले होते. 

नववर्ष स्वागतसाठी पर्यटकांनी अलिबागला पसंती दिली होती. त्यामुळे शनिवार पासून अलिबागमध्ये पर्यटकांची रेलचेल सुरू झाली होती. अनेक पर्यटक हे जलवाहतूक तसेच एस टी बसचा प्रवास करून अलिबागेत दाखल झाले होते. रविवारी सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षाचे स्वागत आलेल्या पर्यटकांनी जल्लोषात केले होते. अलिबागचे समुद्रकिनारे हे पर्यटकांनी बहरून गेले होते. ३१ डिसेंबर रोजी रात्री पार्टी करून पर्यटक मद होष झाले होते.

सोमवारी १ जानेवारी २०२४ रोजी पर्यटक हे पुन्हा मुंबई, ठाणे कडे माघारी जाण्यास निघाले. बसने आलेले पर्यटक हे अलिबाग आगारात दाखल झाले. मुंबईकडे जाणारी परतीची बस पकडण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी सायंकाळच्या सुमारास आगारात झाली होती. वीना वाहक पनवेल बसला आगारात तुफान गर्दी झाली होती. तर इतर ठिकाणी जाणाऱ्या मार्गावरही पर्यटक बसची वाट पाहत होते. अलिबाग आगारातून नववर्षाच्या अनुषंगाने नियोजन केलेले असले तरी त्याचा फज्जा उडाला होता. बाहेरून आगारात येणाऱ्या बसेस ही वाहतूक कोंडीत अडकले असल्याने ती एक अडचण निर्माण झाली होती. अलिबाग आगारात सायंकाळच्या सुमारास हजारो पर्यटक प्रवासी हे बसची वाट पाहत ताटकळत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. जलवाहतूकिवरही प्रवाशांची गर्दी

मांडवा येथून जलवाहतूककीने गेटवेला जाण्यासाठी प्रवशांची गर्दी झाली होती. दुपारी नंतर ही गर्दी वाढल्याने जलवाहतूकिवर परिणाम दिसला. जलवाहतूक बोटी व्यवसायिकही प्रवाशांची गैरसोय सोडविण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र प्रवासी संख्या अधिक असल्याने त्याचेही वेळापत्रक कोलमडले होते.

टॅग्स :alibaugअलिबागtourismपर्यटन