शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड तालुक्यात पर्यटकांची रेलचेल; पावसाळी वातावरणातही पर्यटक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 23:18 IST

घोडेस्वारी, त्याचप्रमाणे समुद्र स्नान करण्याचा आनंद पर्यटक घेताना दिसत होते. स्थानिक घोडेस्वार व वाळूवर चालणाऱ्या गाड्या धावत होत्या,

मुरुड : तालुक्यात शनिवारपासून पावसाळी वातावरण असतानाही पर्यटकांनी येथे येणे पसंद केले आहे. मुंबईपासून १६५ किलोमीटर अंतरावर मुरुड असल्याने ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली येथील पर्यटक मुरुडला सर्वाधिक पसंती देत असतात. विशाल असा समुद्रकिनारा व ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्याकडे पर्यटकांचा कल सर्वाधिक असतो. शनिवार, रविवार पाऊस असतानाही पर्यटकांनी मुरुडमध्ये गर्दी केली होती.

घोडेस्वारी, त्याचप्रमाणे समुद्र स्नान करण्याचा आनंद पर्यटक घेताना दिसत होते. स्थानिक घोडेस्वार व वाळूवर चालणाऱ्या गाड्या धावत होत्या, तसेच स्थानिकांच्या चहा टपरी व अल्पोहार यावर गर्दी दिसून येत होती, तर काही पर्यटकांनी राजपुरी जेट्टी व खोरा बंदर या ठिकाणी जाऊन जंजिरा किल्ला लांबून पहाण्याचा आनंद घेतला. सध्या जंजिरा किल्ला पर्यटकांना खुल्ला करण्यात आलेला नाही. त्यामुळे असंख्य पर्यटक हा किल्ला दुरून पाहताना दिसत आहेत.

जंजिरा किल्ल्यावर मार्च महिन्यापासून शिडाच्या बोटी बंद ठेवण्यात आलेल्या आहेत, तसेच किल्लाही बंद ठेवण्यात आल्याने स्थानिकांचा स्वयंरोजगार बंद पडला असून, त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. जंजिरा किल्ल्यावर स्थानिक बोट मालक शहाळी विक्रेते, सरबत विक्रेते, टोपी व गॉगल विक्रेत्याचे धंदे कायमस्वरूपी बंद पडल्याने, या ठिकाणी रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.रोजगार पुन्हा प्राप्त व्हावा, यासाठी शासनाने लवकरात लवकर जंजिरा किल्ला सुरू करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :tourismपर्यटनCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस