शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनासाठी किल्ल्यांना पसंती, प्रेक्षणीय स्थळे लवकरच जगाच्या नकाशावर : कोकणातील स्थानिकांना मिळणार रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 02:52 IST

महाराष्ट्राचा गड-किल्ल्यांचा इतिहास अनन्यसाधारण असाच आहे. गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्न पाहिले आहे. त्यात दुर्गराज रायगडच्या विकासासाठी केंद्रीय स्तरावरून भरीव निधी उपलब्ध करून देवून

विशेष प्रतिनिधी अलिबाग : महाराष्ट्राचा गड-किल्ल्यांचा इतिहास अनन्यसाधारण असाच आहे. गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्न पाहिले आहे. त्यात दुर्गराज रायगडच्या विकासासाठी केंद्रीय स्तरावरून भरीव निधी उपलब्ध करून देवून ते स्वप्न वास्तवात उतरवण्यास देखील प्रारंभ केला आहे. जमिनीवरील, पर्वतावरील आणि समुद्रातील अशा तीन प्रकारच्या गडकोटांनी कोकण समृद्ध आहे. वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले हे गड-किल्ले आणि प्रेक्षणीय स्थळे लवकरच जगाच्या नकाशावर येणार आहेत. पर्यटन क्षेत्रात काम करणाºया ‘एआरबीएनबी’ या आंतरराष्टÑीय पर्यटन कंपनीने त्यासाठी पुढाकार घेवून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाच्या सहयोगाने हे वास्तवात येत आहे. यामुळे राज्याच्या पर्यटन वृद्धीबरोबरच स्थानिक बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.महाराष्टÑात ३५० हून अधिक गड-किल्ले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसह अन्य अनेक राजवटींच्या सत्ता या किल्ल्यांनी अनुभवलेल्या आहेत. काही मोजके गड-किल्ले सोडले तर इतिहासाच्या या ठेव्यांकडे गेल्या काही वर्षात दुर्लक्ष झाले आहे. मात्र, महाराष्टÑ राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) इतिहासाचा हा ठेवा सर्वसामान्यांसाठी खुला व्हावा यासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेवून नियोजन केले आहे. त्यासाठी एआरबीएनबी या पर्यटन क्षेत्रात कार्य करणाºया कंपनीसोबत एमटीडीसीने करार केला आहे. एआरबीएनबी कंपनीने जगभरातील विविध देशामधील ऐतिहासिक किल्ले तसेच महत्त्वाचा ठेवा असलेल्या वास्तू आपल्या माध्यमातून आॅनलाइन पध्दतीने पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. आता राज्यातही गड-सागरी किल्ले व ऐतिहासिक वास्तू असलेल्या भागातील पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.राज्यातील गड-किल्ले आणि सागरी किल्ले असलेल्या भागातील पर्यटन वाढीबरोबरच ‘बेड आणि ब्रेकफास्ट’ अर्थात निवास-न्याहारी या योजनेव्दारे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे. स्थानिक रहिवाशांना त्यासाठी एमटीडीसीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात गड व सागरी किल्ले असलेल्या भागातील नागरिकांना रोजगार देण्यात येणार आहे.पुढील टप्प्यात राज्यातील ऐतिहासिक वास्तू असलेली गावे शहरामध्ये अशाच पध्दतीने ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती एमटीडीसीच्या सूत्रांनी दिली आहे.कोकण विभागीय आयुक्तस्तरावरून नियोजन१एमटीडीसी व एआरबीएनबी कंपनी यांच्यात करार झाला आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या एका आढावा बैठकीत कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली आहे. त्या माध्यमातून जिल्ह्यातील गड व सागरी किल्ले तसेच ऐतिहासिक ठेव्यांची माहिती गोळा केली जाणार आहे. त्यातून पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केला जाणार आहे.२बेड आणि ब्रेकफास्टच्या माध्यमातून त्या त्या भागातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. पर्यटन क्षेत्रात आॅनलाइन सेवा देणारी एनआरबीएनबी ची कंपनी सन २००८ पासून कार्यरत आहे. अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को व कॅलिफोर्निया शहरातील पर्यटन स्थळांची माहिती आॅनलाइन पध्दतीने जगासाठी याच कंपनीने खुली करून दिली.३आतापर्यंत जगातील १९१ देशातील ३४ हजार शहरातील ऐतिहासिक ठेवा आॅनलाइन पध्दतीने उपलब्ध करुन दिला आहे. येत्या काळात देशातील गड-सागरी किल्ले व ऐतिहासिक वास्तू अशा १८ हजार वास्तूंचाठेवा जगासाठी खुला करून देण्यातयेणार आहे. त्यामुळेच देशाच्या पर्यटन वाढीस हातभार लागणार आहे.