- आविष्कार देसाई, अलिबागआगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या माध्यमातून लढणार आहेत. युतीमध्ये काँग्रेसला सामावून घेण्यासाठी राजकीय हालचालींनी वेग आला आहे. पारंपरिक कट्टर विरोधक असलेले पक्ष सत्तेसाठी एकाच तंबुत संसार थाटण्याच्या तयारीत असल्याने रायगडच्या राजकारणात चांगलीच रंगत येणार आहे.शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक शुक्रवारी मुंबईमध्ये पार पडली. रायगड जिल्ह्यातील नऊ नगरपालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलेच मनसुबे आखले आहेत. शिवसेनेला नगर पालिकेच्या सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी काँग्रेसच्या माध्यामातून व्यूहरचना आखली आहे. युतीमध्ये काँग्रेसला सामावून घेण्यात येणार आहे. मुरुड, रोहे, उरण, माथेरान, श्रीवर्धन आणि महाड या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेससोबत सकारात्मक चर्चा सुरु असल्याचे शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त प्रेस नोटमध्ये नमुद करण्यात आले आहे. शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक शुक्रवारी मुंबईमध्ये पार पडली. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, आमदार सुरेश लाड, शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, आमदार पंडीत पाटील यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.अलिबाग नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून पुन्हा प्रशांत नाईक यांची वर्णी लागली आहे. उर्वरीत नगर पालिकेच्या नगराध्यक्ष आणि संभाव्य उमेदवारांची नावे दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर २८ आॅक्टोबरला जाहीर करण्यात येणार असल्याचे शेकापचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस परेश देशमुख यांनी सांगितले. शिवसेनेला रोखण्यासाठी काँग्रेसलासोबत घेण्यात येणार आहे. याबाबत सकारात्मक चर्चा होत असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. मुरुड, रोहे, उरण, माथेरान, श्रीवर्धन आणि महाड नगर पालिकेत शिवसेना डोईजड होऊ शकते यासाठीच तेथे काँग्रेसलाही सोबत घेण्यात येत आहे. काँग्रेसची बोलणी शेकापसोबत नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सुरु असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर.सी.घरत यांनी लोकमतशी बोलताना मान्य केले. जिल्ह्यात सध्या काँग्रेसची पिछेहाट झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसला उर्जितावस्थेत नेण्यासाठी काँग्रेसला युती सोबत जाणे भाग आहे. परंतू युतीमध्ये त्यांची फरफट होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. महाआघाडीसाठी हालचाली सुरू१शेकापचा बालेकिल्ला असणाऱ्या अलिबाग नगर पालिकेत या युती विरोधात काँग्रेस, शिवसेना, मनसे, भाजपा यासह अन्य पक्षांची महाआघाडी निर्माण करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही.२अलिबाग नगर पालिकेवर शेकापचे वर्चस्व आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळाव्यात असा कार्यकर्त्यांचा सुरु आहे. परंतू शेकाप सहजासहजी येथे कोणाला शिरकाव करु देणार नाही हेही सत्य आहे.
सत्तेसाठी कॉग्रेस-शेकाप-राष्ट्रवादी एकत्र
By admin | Updated: October 23, 2016 03:35 IST