शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:17 IST

भरारी पथकांसह कडक पोलीस बंदोबस्त : सरपंचपदासह एक हजार ८५७ उमेदवार रिंगणात

अलिबाग : जिल्ह्यातील एकू ण ७९ ग्रामपंचायतींसाठी रविवार, २४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. थेट सरपंचपदासाठी २२६ तर सदस्यपदासाठी एक हजार ६३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. जिल्हाभरात ३१४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी मतदान यंत्रे घेऊन अधिकारी व कर्मचारी शनिवारी दुपारी संबंधित मतदान केंद्रांवर दाखल झाले. मतदान यंत्रांची तसेच कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी प्रशासनाकडून खासगी वाहनांचा वापर करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ७९ ग्रामपंचायतींसाठी हे मतदान होणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदाची निवडणूक पहिल्यांदाच होत आहे. ७९ पैकी एका ग्रामपंचायतीत सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने सरपंचपदासाठी ७८ ग्रामपंचायतींमध्येच निवडणूक प्रक्रिया होणार आहे. या ७८ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी २२६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर ७९ ग्रामपंचायतींच्या ७११ सदस्यपदाच्या जागांसाठी एक हजार ६३१ उमेदवार रिंगणात आहेत.

जिल्ह्यातील ग्र्रामपंचायतींत आपल्याच पक्षाची सत्ता यावी, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसून प्रचार केला होता. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी तापलेले वातावरण शुक्रवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्यावर आता शांत झाले. आदल्या रात्रीच्या घरोघरच्या मतदार भेटींना वेग आला.

१५७ पोलीस बंदोबस्तासाठी रवानाच्रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रातील ७६ ग्रामपंचायतींमध्ये रविवारी होणारे मतदान व सोमवारी होणारी मतमोजणी या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार वा कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने ज्या पोलीस स्टेशन हद्दीत निवडणूक पार पडणार आहे, त्या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रायगड पोलीस मुख्यालयातून पोलीस स्टेशननिहाय १५७ पोलीस कर्मचारी रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.चौलमध्ये निवडणुकीसाठी यंत्रणा सज्जच्रेवदंडा : चौल ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार थंडावल्यानंतर आता शासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. रविवार, २४ फेब्रुवारी रोजी होणाºया निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर कर्मचाºयांची वर्दळ दिसून आली.सोनारीत जोरदार लढतउरण : उरणमधील सोनारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. सोनारी ग्रामपंचायतीची निवडणूक रविवारी होत आहे. सरपंच एक तर तीन प्रभागांतून नऊ अशा एकूण दहा जागांसाठी निवडणुकीत २० उमेदवार रिंगणात आहेत. कोणाच्या पारड्यात मतदारराजा मत टाकतो, हे सोमवार, २५ फे ब्रुवारीला निकालानंतर स्पष्ट होणार आहे.३१४ मतदान केंद्रांवर होणार मतदानच्७९ ग्रामपंचायतींसाठी ३१४ मतदान केंद्रांवर रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान मतदान प्रक्रिया राबविण्यात येईल. या केंद्रांवर ३५६ मतदान यंत्रांच्या माध्यमातून मतदान घेण्यात येईल. मतदानांती मतदान यंत्रे संध्याकाळी संबंधित तहसील कार्यालय वा मतमोजणी केंद्रावर आणण्यात येतील. सोमवार, २५ फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.