शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2016 01:31 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचा ३४२ वा स्मृतिदिन सोमवारी किल्ले रायगडावर साजरा करण्यात येणार असून रविवारी सायंकाळपर्यंत

महाड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचा ३४२ वा स्मृतिदिन सोमवारी किल्ले रायगडावर साजरा करण्यात येणार असून रविवारी सायंकाळपर्यंत गडावर राज्यभरातून सुमारे चाळीस हजारहून अधिक शिवभक्त दाखल झाले आहेत. रविवारी सकाळपासून गडाकडे जाणारा रस्ता शिवभक्तांनी गजबजलेला पहायला मिळाला. भगवे झेंडे लावलेल्या वाहनांच्या या मार्गावर रांगाच्या रांगा लागल्या होत्या. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून या सोहळ्यात गडावर एक लाखाहून अधिक शिवभक्त हजेरी लावतील असा अंदाज या सोहळ्याचे आयोजक असलेल्या अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन महोत्सव समितीकडून व्यक्त केला जात आहे.या सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणेसह स्थानिक प्रशासन सज्ज असून सोमवारी स. ८.४० वा. मुख्यमंत्र्यांचे गडावर आगमन होणार आहे. छत्रपतींचे वंशज युवराज संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली या निमित्त दोन दिवस रायगडावर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. रविवारी सायंकाळी युवराज संभाजीराजे यांचे चित्रदरवाजा येथे आगमन झाले. त्यानंतर ते आपल्या शेकडो शिवभक्तांसह गडावर पायी चढून दाखल झाले. रविवारी सायंकाळी गडपूजनाने या सोहळ्यात प्रारंभ झाला. देवीचा गोंधळ, धार्मिक पूजा आरती, तसेच रात्री शिवशाहीर दिलीप सावंत (कोल्हापूर), सुरेश जाधव (औरंगाबाद) यांची शाहिरीची जुगलबंदी पहायला मिळणार आहे. ६ जूनला पहाटे ५.३० वा. जगदीश्वर पूजन, ध्वजारोहण, शाहिरी मुजरा, त्यानंतर छत्रपती घराण्याच्या पुरोहितांच्या मंत्रघोषात शिवप्रतिमेवर सुवर्ण नाण्यांचा युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात येणार आहे. त्यानंतर शिवजय घोषित ढोलताशाच्या गजरात शिवप्रतिमेची शिवकालीन वेषभूषेतील मावळ्यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी हेलिकॉप्टरमधून मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. (वार्ताहर)