शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृतीसाठी आज ‘मध्यस्थी’चा परिसंवाद

By admin | Updated: June 10, 2017 01:17 IST

दिवसेंदिवस आपली सहनशीलता कमी होते आणि कायदेशीर खटल्यांची वाढ अत्यंत वेगाने होतेय. या खटल्यांमध्ये आपली

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : दिवसेंदिवस आपली सहनशीलता कमी होते आणि कायदेशीर खटल्यांची वाढ अत्यंत वेगाने होतेय. या खटल्यांमध्ये आपली सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागते. आपला पैसा, अमूल्य वेळ आणि जीवनाचा आनंद खर्ची पडतो. ‘तडजोड’ करणे आपल्याला कमीपणाचे वाटते अन् आपले आयुष्य खरोखरीच उजाड होते. नातेसंबंधात दुरावा निर्माण होतो. न्यायालय हे न्याय मिळवण्याचे ठिकाण असून तिथे फक्त अनिवार्य प्रकरण दाखल करायचे असते. याचे भान व जाणीव सर्वांना नाही, म्हणूनच सर्व लोकांनी न्यायालयाचा अनावश्यक भार टाळण्यासाठी हातभार लावायला हवा. ‘मध्यस्थी’चा पुरस्कार व जनजागृती करून, या सामाजिक कार्यात सामील व्हा, असे आवाहन इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्बिट्रेशन अ‍ॅण्ड मेडिएशन या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत जनजागृतीसाठी या संस्थेच्या वतीने पनवेलमध्ये १० जूनला एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रयोजक आहे.इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्बिट्रेशन अ‍ॅण्ड मेडिएशन संस्था ही खासगी मध्यस्थीचे काम २००१पासून प्रभावीपणे करत आहे. अशा प्रामाणिक मध्यस्थी व्यक्तींकडून येत्या १० जून रोजी पनवेल येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लिगल इंटेग्रिटी एलएलपी या संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. पनवेल येथील के. वि. कन्या विद्यालय, कोकण एज्युकेशन सोसायटी कॅम्पस येथे मध्यस्थी या संकल्पनेच्या जनजागृतीसाठी परिसंवाद व मध्यस्थीद्वारे वाद निराकरण विनामूल्य शिबिर आयोजित केले आहे.