शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखू, सिगारेट विक्रीवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:23 IST

कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी खुलेआम धूम्रपान करणे कायद्याने गुन्हा आहे.

जयंत धुळप अलिबाग : कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी खुलेआम धूम्रपान करणे कायद्याने गुन्हा आहे. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या स्वत:च्या आरोग्यावर मोठा परिणाम होतोच; पण त्याचबरोबर त्याच्या जवळपास असणाºया निर्व्यसनी लोकांच्या आरोग्यावरही त्याच्या धूम्रपानाचा परिणाम होतो, शिवाय कर्करोगाचा धोकाही बळावतो. युवकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यासाठी सिगारेट-तंबाखूजन्य पदार्थ विक्री कायदा-२००३ (कोटपा)ची कडक अंमलबजावणी रायगड जिल्ह्यात करणार असून, त्याचे प्रशिक्षण रायगड पोलिसांना देण्यात आल्याची माहिती रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दिली आहे.सार्वजनिक ठिकाणी, शाळा परिसरात खुलेआम सिगारेट फुंकणाºयावर, तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्र ीवर लगाम घालणाºया सिगारेट-तंबाखूजन्य पदार्थ विक्र ी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात सोमवारी एका खास प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कोटपा कायद्यान्वये कोणाकोणावर कारवाई करणे शक्य आहे, शाळा परिसरात तंबाखू-सिगारेट विकणाºयावर कशा प्रकारे कारवाई करता येईल, अशा अनेक प्रश्नांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले. या कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीकरिता भारतात कार्यरत असलेल्या ‘संबंध हेल्थ फाउंडेशन’ या संस्थेतर्फे रायगड पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले. संस्थेचे प्रकल्पप्रमुख दीपक छिब्बा आणि राज्य व्यवस्थापक देविदास शिंदे यांनी कोटपा कायदा अंमलबजावणी संदर्भात प्रशिक्षण दिले.राज्यात दरवर्षी एक लाख पाच हजार लोक तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे बळी पडतात. त्यापैकी अनेकांना रु ग्णालयात कर्करोगाचे निदान होईपर्यंत उशीर झालेला असतो.वयस्कर लोकांपेक्षा तरु ण आणि मुलांचे सिगारेट-तंबाखू सारख्या पदार्थांच्या सेवनाला आहारी जाण्याचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्रात दिवसाला ५२९ मुले तंबाखू-सिगारेटच्या आहारी जात असल्याचे संबंध हेल्थ संस्थेचे प्रकल्पप्रमुख दीपक छिब्बा यांनी या वेळी सांगितले. मात्र, कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यास हा आकडा कमी करता येईल, असा विश्वासही त्यांनी पुढे व्यक्त केला.बालकांना किंवा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्र ीवर प्रतिबंध आहेत. या कायद्यानुसार २०० रु पये चलन पावती दंड किंवा बाल न्याय कायदा २०१५नुसार एक लाख रु पये दंड आणि सात वर्षांची शिक्षा, अशी तरतूद असल्याचे या वेळी सांगण्यात आले. रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीसठाण्यातील पोलीस अधिकारी या कार्यशाळेत उपस्थित होते. प्रशिक्षणास उपस्थित सर्व अधिकाºयांनी कायद्याचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशिक्षणानंतर कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्धार केला आहे.