शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वेळेच्या नियोजनात तीन तालुके फेल

By admin | Updated: March 10, 2017 03:39 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यांना निर्धारित वेळेत पूर्ण करता येणार नाही.

- आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यांना निर्धारित वेळेत पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्यावाचून प्रशासनासमोर पर्यायच नसल्याचे समोर आले आहे. ध्येयाचा पाठलाग करताना सुधागड, रोहे, माणगाव, पनवेल, खालापूर, मुरुड तालुक्यांची दमछाक होणार असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. स्वच्छ भारत अभियानाची डेडलाइन हुकू नये, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. ताज्या आकडेवारीनुसार वैयक्तिक शौचालयांमध्ये रायगड जिल्ह्याचा पंधरावा क्रमांक लागतो, तर जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात सातवा क्रमांक लागतो. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा दोन्ही बाबतीमध्ये अग्रेसर राहिला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. स्वच्छ भारत अभियान मार्च २०१९पर्यंत राबविले जाणार असल्याने अद्यापही जिल्ह्याला स्पर्धेत टिकून राहण्याची संधी आहे. मात्र, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, नागरिकांना झोकून देऊन काम करावे लागणार आहे.- रायगड जिल्ह्याला ६१ हजार ५४० वैयक्तिक शौचालयाची निर्मिती करायची आहे. तळा, महाड, उरण, श्रीवर्धन, पोलादपूर, म्हसळा तालुक्यांतील वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.- अलिबाग तालुक्याला दिवसाला ७९ शौचालय बांधावी लागणार आहेत, तर पेण तालुक्याला ७७ आणि कर्जत तालुक्याला ९७ शौचालयांची उभारणी करावी लागणार आहे. या तीन तालुक्यांना निर्धारित वेळेत काम पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे वेळ वाढवून घेण्याची तयारी त्यांनी केली आहे.- स्वच्छ भारत अभियानाचा आलेख गेल्या सहा महिन्यांत वाढला आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्वांनाच फैलावर घेतल्याने सुमारे ४० हजार शौचालये या कालावधीत बांधून झाली आहेत, असे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नियोजित वेळेत अभियान पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. - अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यांची अतिशय खराब कामगिरी आहे. त्यांना अनुक्रमे नऊ हजार ४२४, नऊ हजार २९७, आणि ११ हजार ६६० शौचालयांची उभारणी करायची आहे. - सुधागड (४२३४), रोहे (६७३१), माणगाव (७६१६), पनवेल (७९८०), खालापूर (३६५१) आणि मुरुड तालुक्याला १८४७ शौचालयांचे उद्दिष्ट गाठायचे आहे. - या तालुक्यांचे काम समाधानकारक नाही.