शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य व्यवसाय आयुक्तांमुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:04 IST

आयुक्तांच्या या मनमानी कारभारामुळे  मच्छीमार नेते, मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडे तक्रार करून न्यायाची मागणी केली आहे. 

मधुकर ठाकूर उरण : केंद्र सरकारच्या बजेटमध्ये मच्छीमारांसाठी कोणत्याही प्रकारच्या आर्थिक तरतुदीची शिफारस करण्यात आलेली नाही. राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यास निधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यमान मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी तरतूद अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे वर्षभरात राज्यातील एकही मच्छीमाराला आर्थिक लाभ मिळणार नसल्याने लाखो मच्छीमारांवर वर्षभरात उपासमारीचे संकट कोसळणार आहे. आयुक्तांच्या या मनमानी कारभारामुळे  मच्छीमार नेते, मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडे तक्रार करून न्यायाची मागणी केली आहे. 

आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छिमारांसाठी आर्थिक बजेटमध्ये काही योजनांसाठी शिफारशी लागू करण्याच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील मच्छीमार आणि मच्छीमार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांची भेट घेऊन विनंती केली होती. मात्र आयुक्तांनी उडवाउडवीची उत्तरे देत मच्छिमारांना हुसकावून लावल्याचा आरोप संतप्त झालेल्या मच्छिमारांकडून करण्यात येत आहे. आयुक्त जुमानत नसल्याने मच्छीमारांनी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांची मंत्र्यांनी चांगलीच कानउघाडणी केली. मात्र त्यानंतरही आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. 

दरवर्षी मच्छीमारांच्या विविध योजनांसाठी काही कोटींच्या निधींची तरतूदही केली जाते. निधीच्या मंजुरीसाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून विविध योजनांची शिफारस केली जाते. यानंतर बजेटमध्ये आर्थिक निधीची तरतूद केली जाते. तसेच, केंद्र, राज्य सरकारकडून प्रामुख्याने एनसीडीसी, डिझेल परताव्याच्या योजना राबविल्या जातात. 

एनसीडीसी योजनेअंतर्गत मच्छीमारांसाठी बोट बांधणीसाठी ४८ ते ६० लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्जावर मच्छीमारांना ३० टक्के सबसिडी दिली जाते. एनसीडीसी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या राज्यातील सुमारे ४०० मच्छीमारांनी कर्जाची रक्कम मिळणार, या आशेवर बोटी बांधण्यास सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी बॅंका, खासगी वित्तपुरवठा करणाऱ्या वित्त संस्थांकडून कर्ज काढले आहे.

मात्र २०१० पासूून एनसीडीसीमार्फत देण्यात येणाऱ्या  कर्जाची रक्कम मिळालेली नाही. तसेच मागील बजेटमध्ये तत्कालीन मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी ५८ कोटींची तरतूद केली होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे डिझेल परताव्याची कोट्यवधी रुपयांची रक्कमही हाती लागलेली नाही. पारंपरिक पर्सनेट आणि खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांसाठी मत्स्य व्यवसाय विभागाने काही निर्बंध घातले आहेत. मात्र यामुळे राज्यातील मच्छिमार आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोनाबरोबरच ही अडचण आल्याने पुढे काय  होणार ही चिंता त्यांना सतावत आहे. 

टॅग्स :uran-acउरणFishermanमच्छीमार