शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाची वेळ येणार नाही

By admin | Updated: September 9, 2015 23:03 IST

मुंबई - गोवा महामार्गावरील रखडलेले काम हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच पाप आहे. त्यांनी केलेल्या चुका आम्हाला भोगाव्या लागत आहेत, अशा कणखर शब्दात रायगडचे

अलिबाग : मुंबई - गोवा महामार्गावरील रखडलेले काम हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच पाप आहे. त्यांनी केलेल्या चुका आम्हाला भोगाव्या लागत आहेत, अशा कणखर शब्दात रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रास्ता रोको आंदोलनाचा समाचार घेतला.महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर ११ सप्टेंबरला रस्त्यावर उतरून त्रास करून घेण्याची वेळ आम्ही येऊ देणार नाही, असाही टोला महेता यांनी लगावला. गणेशोत्सवापूर्वी जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस अशीही रस्त्यावरच आलेली आहे. त्यांनी आता जमिनीवर पाय ठेवायला शिकले पाहिजे, आंदोलने कशी करायची हेही त्यांनी आता शिकले पाहिजे, असा सल्ला महेता यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दिला. या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील आदी ुमान्यवरांसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ््या संख्येने उपस्थित होते. (अधिक वृत्त/३)पालकमंत्री प्रकाश महेता यांचे आदेशराष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकेदार यांच्याशी संपर्क साधून गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.कर्जत- खोपोली, कर्जत- मुरबाड आणि कर्जत- माथेरान हे रस्ते एमएमआरडीएने करावेत अशी सूचना केली आहे.गणेशोत्सवाच्या काळात मुंबई - गोवा महामार्गावर प्रचंड ताण पडतो. येथील वाहतूक सातारामार्गे वळवून त्या मार्गावरील टोलमधून १८ तारखेपर्यंत सूट देण्यात यावी, अशी मागणी परिवहन मंत्र्यांकडे करणार असल्याचे मेहता यांनी सांगितले.गणेशोत्सवात मुंबई-गोवा या महामार्गावर १०८ रुग्णवाहिका जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडील रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहेत. पेंडॉल टाकून तेथे पोलीस चौक्या उभारण्यात येणार आहेत. लोडशेडिंग बंद करण्याच्याही सूचना एमएसईबीला केल्या आहेत. श्रीवर्धन-म्हसळा-दिघी हा ५३ किमीचा रस्ता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने करावा, यासाठी दोन दिवसांत बैठक घेणार आहे.१४ ते १७ सप्टेंबर या कालावधीत पूर्णत: अवजड वाहतूक या मार्गावरून बंद करण्याचे आदेश रायगड पोलिसांना दिले आहेत.