शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

भरतीचे पाणी आले रस्त्यावर, बाजार समितीजवळील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 02:30 IST

समुद्राला आलेल्या भरतीमुळे मंगळवारी एपीएमसी व वाशी परिसरातील नाले तुडुंब भरले. मसाला मार्केटजवळ भरतीचे पाणी रोडवर आल्यामुळे खळबळ उडाली होती.

नवी मुंबई :  समुद्राला आलेल्या भरतीमुळे मंगळवारी एपीएमसी व वाशी परिसरातील नाले तुडुंब भरले. मसाला मार्केटजवळ भरतीचे पाणी रोडवर आल्यामुळे खळबळ उडाली होती. भरतीचे पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या होल्डिंग पाँडची साफसफाई केली जात नसल्यामुळे व इतर कारणांमुळे पाणी शहरात येऊ लागले असून योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.               नवी मुंबई नियोजनबद्ध शहर असल्याचे बोलले जाते. परंतु शहराचे नियोजन चुकत असल्याचे सद्य:स्थितीमध्ये निदर्शनास येऊ लागले आहे. मंगळवारी समुद्राला भरती आल्यामुळे खाडीतील पाणी नाल्यांमधून वाशी, एपीएमसी ते कोपरीपर्यंत गेले होते. नाले तुडुंब भरून बाजार समितीजवळ पाणी रोडवर आले होते. यापूर्वी सीबीडीमध्ये भरतीचे पाणी पालिका मुख्यालयापर्यंत आले होते. जवळपास तीन फूट पाणी रोडवर साचले होते. वाशी सेक्टर १७ मध्येही काही वर्षांपूर्वी भरतीचे पाणी शिरले होते. नवी मुंबई खाडीकिनारी वसलेले शहर आहे. सिडकोने प्रत्येक नोडमध्ये होल्डिंग पाँड तयार केले आहेत. शहरातील पाावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची व्यवस्थित साफसफाई केली जात नाही. नाल्यांमध्ये गाळ साचला आहे. होल्डिंग पाँडची व नाल्यांची साफसफाई केली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अवैधरीत्या मातीच्या भरावामुळे भरतीचे पाणी उरण-पनवेल रस्त्यावर उरण :  सिडको, जेएनपीटीने केलेल्या अवैधरीत्या मातीच्या भरावामुळे मंगळवारी ( ३०) समुद्राच्या भरतीचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने बोकडवीरा गावानजीक असलेला उरण-पनवेल मार्गावरील सुमारे एक किलोमीटर रस्ता पाण्याखाली गेला होता.  उरण परिसरात जेएनपीटी, सिडकोने विविध प्रकल्पांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर दगडमातीचे भराव केले आहेत. प्रचंड प्रमाणावर अनधिकृतपणे करण्यात आलेल्या भरावामुळे मात्र, गावोगावी असलेल्या नैसर्गिक नाले, गटारे बुजून गेली आहेत. यामुळे दरवर्षी समुद्राच्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या उधाणाच्या भरतीमुळे समुद्राचे पाणी थेट काही गावागावांत शिरू लागले आहे. मंगळवारी (३०) तर समुद्राच्या भरतीचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने बोकडवीरा गावानजीक असलेला उरण-पनवेल मार्गावरील सुमारे एक किलोमीटर रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे रस्त्यावरील सिडकोच्या द्रोणागिरी कार्यालयासमोरही समुद्राचे पाणी जमा झाले होते. त्यामुळे पाण्याचा निचरा होईपर्यंत वाहनांची गती मंदावली होती.अवैधरीत्या मातीच्या भरावामुळे  अशा प्रकारे समुद्र भरतीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते.      

टॅग्स :WaterपाणीRaigadरायगड