शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कशेडी घाटात तीन वेळा कोसळली दरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:54 IST

काही तास वाहतूक विस्कळीत

पोलादपूर : गेल्या दहा दिवसात पावसाचे तुफान सुरू असून तालुक्यात पावसाने ३ हजाराचा टप्पा पार केला असून ठिकठिकाणी आपत्ती ओढवली आहे. कशेडी घाटात गेल्या २४ तासात तीन वेळा दरड कोसळल्याने काही तास वाहतूक विस्कळीत झाली होती तर रेवेवाडी- पैठण- कोतवाल रस्ता मोठ्या प्रमाणावर खचल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.कशेडी घाटातील दरवर्षी खचणाऱ्या भोगाव हद्दीतील महामागाबाबत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत येथे उड्डाणपूल बांधणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तालुक्यात ठिकठिकाणी वृक्षाच्या फांद्या पडल्याने मार्ग बंद झाले होते. पावसाचे तुफान पुन्हा एकदा पोलादपूरकारांना अनुभवास आले असून ऑगस्टच्या पहिल्याच सप्ताहात ३ हजारांची सरासरी ओलांडली आहे. रविवारी सुमारे १५२ मिमी पावसाची नोंद झाली असून ९० टक्के पाऊस पडला आहे.तालुक्यात गेल्या चार दिवसात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबई -गोवा महामार्गावर कशेडी घाट परिसरात तिसऱ्यांदा दरड कोसळल्याने मातीचा सडा पहावयास मिळाला. रविवारी पहाटे ५.४५ वाजण्याच्या सुमारास धामणदेवी येथे पुन्हा दरड कोसळली. जेसीबीच्या साहायान सकाळी ७ वाजता रस्ता पूर्ववत करण्यात आला मात्र या भागात पावसाच्या पाण्या समवेत डोंगरवरची माती खाली येत असल्याने महामार्गावर मातीचा सडा पडल्याने वाहतूक संथगतीने मार्गस्थ होत होती.तालुक्यतील कोतवाल खुर्द रेववाडी पैठण- कोतवाल रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला असून रेववाडीतील घरांना धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली असली तरी पादचारी आपला जीव मुठीत ठेऊन मार्गस्थ होत आहेत. हा मार्ग सुमारे तीन ते चार फूट खाली खचला असून अभ्यासकांकडून या मार्गाची पाहणी करत नव्याने रस्ता करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.बोरघर -कामथे रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक बंद होती. येथील झाड बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरु झाली आहे. तालुक्यातील आपत्तीसह दरडी नोंद आपत्तीमध्ये करण्यात आली असून महसूल कर्मचारी, पोलीस अधिकारी- कर्मचाºयांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.