शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये तीन दिवसांचे प्रशिक्षण

By admin | Updated: June 16, 2017 02:11 IST

रायगड किल्ला संवर्धन, जतन व परिसर विकास आराखड्यातील कामांच्या सुयोग्य अंमलबजावणीकरिता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत सर्व संबंधित शासकीय

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड किल्ला संवर्धन, जतन व परिसर विकास आराखड्यातील कामांच्या सुयोग्य अंमलबजावणीकरिता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत सर्व संबंधित शासकीय यंत्रणांसाठी तीन दिवसांच्या विशेष प्रशिक्षणाला महाडमध्ये बुधवारपासून सुरुवात झाली आहे. या प्रशिक्षणात विविध विषय तज्ज्ञ मार्गदर्शन करीत असल्याची माहिती रायगड जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी दिली आहे.या विशेष प्रशिक्षणात नवी दिल्ली येथील नॅशनल म्युझियम संस्थेचे तज्ज्ञ प्रो. डॉ. आर. के. सिंग, आय. आय. टी. चेन्नईचे असोसिएट प्रो.अरु ण मेनन, मुंबईतील जे. जे. स्कूल आॅफ आर्किटेक्चरचे प्राचार्य डॉ. राजीव मिश्रा, नवी दिल्ली येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे सह महासंचालक जे.शर्मा, एमएनपी अहमदाबाचे उप महाव्यवस्थापक पी. वासुदेवन नायर, एएसआय मुंबईचे पश्चिम विभागीय संचालक डॉ. एम. नंबीराजन, एएसआय बडोदाचे अनिल तिवारी, एएसआय मुंबई अतुल भार्गव मार्गदर्शन सत्रे घेत आहेत.रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, वन विभाग रोहा, बी.एस.एन.एल. महाड, सामाजिक वनीकरण विभाग आदी शासकीय यंत्रणांमधील वरिष्ठ अधिकारी या विशेष प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. रायगड जिल्हा नियोजन विभागामार्फत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून या प्रशिक्षणाचा लाभ रायगड किल्ला संवर्धनासाठी निश्चित होईल, असा विश्वास जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी व्यक्त केला आहे.