शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

हजारो एकर भातशेतीचे नुकसान

By admin | Updated: November 4, 2015 00:53 IST

गेले दोन दिवस समुद्राला आलेल्या मोठ्या उधाणामुळे खाडीच्या भोवतालचे शेतीच्या संरक्षणासाठी बांधलेले बांध खार बंदिस्ती फुटून अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले

उरण : गेले दोन दिवस समुद्राला आलेल्या मोठ्या उधाणामुळे खाडीच्या भोवतालचे शेतीच्या संरक्षणासाठी बांधलेले बांध खार बंदिस्ती फुटून अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. कोजागिरी पौर्णिमेपासून दोन दिवस समुद्राला मोठी भरती आहे. या दिवशीच बांध फुटून शेकडो एकर जमिनीत खाडीचे पाणी घुसले आहे. काही ठिकाणी शेतात कापलेली भाताची कणस पाण्यामुळे वाहून गेली तर काही भिजल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.उरण तालुक्यातील बेलोंडाखार, खोपटे खाडी, दादरपाडा मोठीजुई, हरिश्चंद्र कोटा, चिखली भोम तसेच पनवेल तालुक्यातील केळवणे गावाजवळील खार बंदिस्ती या मोठ्या उधाणामुळे फुटली आहे. या खार बंदिस्तीची देखभाल करण्याची जबाबदारी ही खारलँण्ड विभाग आणि सिडकोकडे आहे. मात्र गेल्या काही वर्षात खारलँण्ड विभागाने उरण भागात कोणत्याही प्रकारची दुरुस्तीची कामे केली नसल्यामुळे खार बंदिस्ती आणि उघाड्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे छोट्या छोट्या भरतीने सुद्धा या उघड्या आणि खार बंदिस्ती फुटून भरतीचे खारे पाणी शेतीत घुसते. खारे पाणी एकदा का शेतीत घुसले तर त्या शेतीत किमान चार वर्षे तरी पीक घेता येत नाही.काही ठिकाणी शेतकरी स्वत:च खार बंदिस्तीच्या दुरुस्तीची कामे करून खाडी किनाऱ्यावर मोठ्या मेहनतीने शेती करत आहेत. मात्र नुकत्याच आलेल्या भरतीमुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली आहे.उरण पश्चिम विभागाची शेती बहुतांश सिडकोने संपादित केली असल्याने त्याची जबाबदारी सिडकोकडे येते. सिडकोने या भागात काही ठिकाणी खाडी किनारी उघाड्यांवर स्वयंचलित दरवाजे (प्लॅफ) बसविले आहेत. हे दरवाजे भरतीच्यावेळी आपोआप बंद होतात त्यामुळे भरतीचे पाणी नागरी भागात किंवा शेतीत घुसत नाही. मात्र गेल्या काही वर्षात हे फ्लॅफ खाडीच्या पाण्यानेकुजले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी या फ्लॅफमधून पाणी नागरी वस्तीत किंवा शेतीत येते.आॅगस्ट -२0१५ मध्ये उरण आणि पनवेल विभागातील खार बंदिस्तीच्या कामाबद्दल उरणचे आ. मनोहर भोईर यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या सोबत बैठक घेऊन ओएनजीसी, सिडको आणि जेएनपीटी या कंपन्यांनी आपल्या सीएसआर फंडातून १५ किलोमीटरचे बंधारे बांधण्यास सांगितले होते आणि या कंपन्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आमदार मनोहर भोईर यांनी सांगितले होते. मात्र त्या कामाबाबत कार्यवाही झाली नाही. (वार्ताहर)कोजागिरी पौर्णिमेच्या दरम्यान सुमारे ५.७ मीटर एवढी मोठी भरती आली होती. यामुळे अनेक ठिकाणी उघाड्यांच्या आणि बांधांच्या वरून हे पाणी शेतीत शिरले आहे. या शेतीचे तहसील आणि कृषी विभागाला पंचनामे करण्यास सांगितले आहेत. ज्या ठिकाणी बांध बंदिस्ती फुटली आहे तेथे रोजगार हमी योजनेअंतर्गत दुरुस्तीची कामे केली जाणार आहे. - ए.एस.भारती, अभियंता, पेण खारलॅण्डखारलँण्ड विभाग आणि सिडकोच्या हलगर्जीपणामुळे दरवर्षी हे प्रकार घडतात. या विभागांनी खार बंदिस्ती दुरुस्तीची कामे वेळेवर हाती घेणे जरुरीचे आहे. तसेच अधिकाऱ्यांनी नुसते कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्षात काम करणे गरजेचे आहे. - वैजनाथ ठाकूर, सदस्य, जिल्हा परिषद जासई