शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मित्रासाठी मंत्रिपद ठोकरणारा आमदार, आमदार सुरेश लाड यांचा एकसष्टी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 03:05 IST

कर्जत : एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुरेश लाड यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. आजचा हा सत्कार समारंभ पाहिल्यावर लाड यांच्या राजकीय भवितव्याबाबत मला मुळीच चिंता वाटत नाही.

कर्जत : एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुरेश लाड यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. आजचा हा सत्कार समारंभ पाहिल्यावर लाड यांच्या राजकीय भवितव्याबाबत मला मुळीच चिंता वाटत नाही. या मतदारसंघात असलेले अनेक कारखाने बंद पडले आहेत. अनेक कामगारांना त्यांच्या हक्काची रक्कम अजून मिळालेली नाही. या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी लाड यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधित खात्यांशी संपर्क साधला तर मी तुमच्यासोबत असेल.शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी आक्र मक होतात हे सर्वांनी पाहिले आहे. तसेच मित्रासाठी मंत्रिपद ठोकरणारा आमदार म्हणजे लाड यांचे कौतुक करावे लागेल. त्यांनी माजी आमदार बी. एल. पाटील आणि वसंतराव राऊत यांची परंपरा सुरेश लाड सांभाळीत असून त्यांना सर्वांची साथ मिळत आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.आमदार सुरेश लाड यांच्या एकसष्ठी सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते. कर्जत खालापूरचे आमदार सुरेश लाड यांचा एकसष्टी निमित्त सत्कार आणि कृतार्थ या गौरव अंकाचे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली दहिवली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचीच्या मैदानावर करण्यात आले होते. याप्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे, माजी मंत्री गणेश नाईक,शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार धर्यशील पाटील, आमदार अनिल तटकरे, आमदार संजय (बाळा) भेगडे, आमदार पांडुरंग बरोरा, आमदार बाळाराम पाटील,राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, माजी आमदार गोटीराम पवार, माजी आमदार देवेंद्र साटम, कला दिग्दर्शक चंद्रकांत देसाई, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अदिती तटकरे आदींसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.आमदार सुरेश लाड यांनी मी जेव्हा समाजकारणाबरोबरच राजकारणात आलो. त्यावेळी आमदारकीपर्यंत जायचे ठरवले नव्हते परंतु मी पक्षाने दिलेली जबाबदारी नेकीने पार पाडली. दिले त्या उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम केले. असे सांगून ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच, सभापती आणि नंतर आमदार पदापर्यंतचा प्रवास दिलखुलासपणे सांगितला. सुनील तटकरे यांनी नेहमीच सर्वच बाबतीत अत्यंत मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले आणि १९९९ मध्ये शरद पवारांच्या परिस स्पर्शाने मी पावन झालो असे सांगण्यास आमदार सुरेश लाड विसरले नाहीत.सतत चार वेळा सुरेश लाड यांच्या विरु द्ध लढलेले माजी आमदार देवेंद्र साटम यांनी आपल्या मनोगतात आमदार लाड म्हणजे एक आदर्श लोकप्रतिनिधी आहेत. जय पराजय होतच असतो मात्र आमची मैत्री अजूनही तशीच राहिली आहे. लाड यांच्या कडून बरेच काही शिकायचे आहे असे स्पष्टपणे सांगितले. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी काम करणारा माणूस अशी सुरेश लाड यांची प्रतिमा असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन नितीन आरेकर आणि समीरा गुर्जर यांनी केले.याप्रसंगी विविध पक्षाचे कार्यकर्ते, संस्थाचे पदाधिकारी, हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगड