शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

तळा येथे पाणी असून नियोजनाचा अभाव

By admin | Updated: May 2, 2016 01:10 IST

तळा गाव गेली कित्येक वर्षे दुष्काळाच्या आणि पाणीटंचाईच्या छायेत होते. यावर उपाय म्हणून तळा नळ पाणीपुरवठा कमिटी स्थापन करुन २५ आॅक्टोबर १९७५ मध्ये तळ्याचे सुपुत्र व भारताचे

तळा : तळा गाव गेली कित्येक वर्षे दुष्काळाच्या आणि पाणीटंचाईच्या छायेत होते. यावर उपाय म्हणून तळा नळ पाणीपुरवठा कमिटी स्थापन करुन २५ आॅक्टोबर १९७५ मध्ये तळ्याचे सुपुत्र व भारताचे माजी अर्थमंत्री डॉ. सी. डी. देशमुख यांच्या हस्ते नवीन योजनेचा भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. अंदाजे ९ लाख रुपयांची ही योजना होती. त्यात १० टक्के लोकवर्गणी होती. मातीचे धरण प्रायोगिक तत्त्वावर बांधून कामाला सुरुवात झाली. पाण्याचा साठा मुबलक झाला पण हे धरण मातीचे असल्या कारणाने गळती सुरू राहिली. धरण गळत असल्याने त्यावेळी घरोघरी नळजोडणी करण्यात आली नाही. तळे गावापासून २ ते ३ कि.मी. दूर असलेल्या अंबेळी येथे १९८५ च्या दरम्यान एक बोअरवेल खणण्यात आली. त्यामुळे धरण पाणीपुरवठा योजनेला अंबेळी बोअरवेल येथील पूरक योजना कार्यान्वित करण्यात आली. गेली अनेक वर्षे धरण योजनेतून वडाची वाडी, मोहिते आळी, पारधी आळी, पुसारी, पुष्पवाटिका, मोहल्ला, कुंभार वाडा व अर्धी बाजारपेठ असा पाणीपुरवठा करु लागले तर अंबेळी बोअरवेल योजनेवरुन राळेची वाडी, मुंठ्याची वाडी, मेट मोहल्ला, फोंडलवाडी, भोईरवाडी, ब्रह्माळी, ब्राह्मण समाज आदी भागात पाणीपुरवठा होत असला तरी उन्हाळ्यात मात्र टंचाईला सामोरे जावे लागते. तळा शहरात १२/१३ वाड्या व सुमारे ६ हजार लोकसंख्या आहे. पाणीटंचाईवर कायमस्वरुपी तोडगा निघावा म्हणून नवीन योजनेसाठी सुमारे २ कोटी रुपये मंजूर केले. गेली ३/४ वर्षे या योजनेचे काम चालू आहे. काम अंतिम टप्प्यात असताना तळा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रुपांतर झाले. त्यामुळे हे काम आहे त्याच स्थिती नगर पंचायतीकडे वर्ग करण्याचे निश्चित करण्यात आले. तळा पाणीपुरवठा कमिटी नळपाणी योजना नगर पालिकेकडे देण्यास तयार आहे परंतु नगर पंचायत त्यामध्ये वेगवेगळे मुद्दे उपस्थित करुन ती योजना ताब्यात घेण्यास विलंब लावीत आहे. याप्रकरणी तळा नगरपंचायतीचे कार्यकारी अधिकारी मंगेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, पाणी कमिटी आणि नगरपंचायतीचे नगरसेवक यांची संयुक्तिक बैठक घेऊन त्यावर मार्ग काढून पुरवठ्याचे योग्य नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.