शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लोकलसाठी मार्गच नाही

By admin | Updated: April 10, 2016 01:10 IST

कर्जत-पनवेलदरम्यान लोकल किंवा शटल सेवा सुरू व्हावी, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रवाशांकडून होत आहे. मात्र हा मार्ग लोकल किंवा शटलच्या प्रवासी वाहतुकीसाठी उभारण्यात आला

- विजय मांडे,  कर्जतकर्जत-पनवेलदरम्यान लोकल किंवा शटल सेवा सुरू व्हावी, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रवाशांकडून होत आहे. मात्र हा मार्ग लोकल किंवा शटलच्या प्रवासी वाहतुकीसाठी उभारण्यात आला नसल्याचा लेखी खुलासा रेल्वे प्रशासनाने केला आहे.२००७ पासून कर्जत रेल्वे प्रवासी संघाचे सदस्य पंकज मांगीलाल ओसवाल हे कर्जत पनवेल प्रवासी वाहतुकीबाबत पाठपुरावा करीत आहेत. ११ फेब्रुवारी २०१६ रोजी रेल्वे प्रशासनाने ओसवाल यांना यासंदर्भात लेखी उत्तर दिले. यात कर्जत-पनवेल हा रेल्वेमार्ग लोकल किंवा शटल सेवेसाठी सुरू करण्यासाठी उभारलाच नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे कर्जतकर प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीच लक्ष घालावे तसेच लोकप्रतिधींनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करावी, अशी विनंती ओसवाल यांनी रेल्वेकडे केली आहे. पनवेल-दिवा-कल्याण-कर्जत सेक्शन हा मार्ग वाहतुकीमुळे व्यस्त आहे. त्यामुळे पर्याय म्हणून कर्जत -पनवेल हा रेल्वेमार्ग उभारला गेला आहे. हा मार्ग प्रामुख्याने मालवाहतुकीसाठी असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.कर्जत-पनवेल रेल्वेमार्गासाठी रेल्वे प्रशासनाने १३७ कोटी २८ लाख खर्च केला आहे. परंतु एवढा खर्च करूनही रेल्वे प्रशासनाला, कर्जत - पनवेल या मार्गावरून अद्याप शटल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. या मार्गावर वार्षिक उत्पन्न खूपच कमी मिळत आहे. १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २००९ पर्यत केवळ रु. १२ लाख ३३ हजार एवढेच उत्पन्न रेल्वे प्रशासनाला मिळाले आहे. या मार्गावरून लोकल अथवा शटल सेवा सुरू झाल्यास उत्पन्नात नक्कीच वाढ होईल, असा विश्वास प्रवासी संघटनांना आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याची मागणी होत आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीमुळे धक्का बसला आहे; तरीही आपला पाठपुरावा सुरूच राहणार आहे. लोकप्रतिधींनी आपला पाठपुरावा सुरूच ठेवावा. कर्जत-पनवेल दरम्यान उभारण्यात येणाऱ्या दुहेरी मार्गावर तरी प्रवासी वाहतुकीचा विचार व्हावा. पंकज ओसवाल, सदस्य प्रवासी संघटना