शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयात हजर राहण्याचे आदेश नाहीत

By admin | Updated: June 19, 2017 05:07 IST

रायगड जिल्ह्यामध्ये सध्या शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या पीएनपी जेटीच्या बनावट कागदपत्राचे प्रकरण चांगलेच गाजत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये सध्या शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या पीएनपी जेटीच्या बनावट कागदपत्राचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. आमदार जयंत पाटील यांना कोर्टात हजर राहण्याबाबत सांगितलेच नसल्याचा दावा आमदार जयंत पाटील यांचे वकील अ‍ॅड. सचिन जोशी यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.अलिबाग तालुक्यातील पीएनपी जेटीच्या परवानगीसाठी आमदार जयंत पाटील, त्यांचे पुत्र नृपाल पाटील आणि प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन पंकज भटनागर यांनी सरकारी बोगस कागदपत्रे तयार केल्याची फिर्याद शहाबाज येथील ग्रामस्थ द्वारकानाथ पाटील आणि दर्शन जुईकर यांनी न्यायालयात दाखल केली होती. त्यांच्या फिर्यादीवरून न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दोन महिन्यांपूर्वी पोलिसांना दिले होते. याप्रकरणाची सुनावणी अलिबाग येथील न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणामध्ये न्यायालयाने आमदार जयंत पाटील, त्यांचे पुत्र नृपाल पाटील यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी आदेश काढले नसल्याचे अ‍ॅड. जोशी यांनी सांगितले. ‘माझे पक्षकार बाहेरगावी गेले असल्याने त्यांनीच दिलेल्या तोंडी सूचनेनुसार मी अ‍ॅड. सचिन जोशी वकील म्हणून त्यांच्यावतीने न्यायालयात हजर होत आहे.’ पुढील तारखेस वकीलपत्र दाखल करण्यात येईल, असे अ‍ॅड. जोशी यांनी सांगितले. तसेच न्यायालयाने पुरशीस दाखल करून घेवून ती मान्य केले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयामध्ये सुरू आहे. त्यामुळे यामध्ये कोण दोषी आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे.