शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
4
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
5
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
6
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
8
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
9
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
10
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
11
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
12
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
13
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
14
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
15
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
16
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
17
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
18
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
19
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
20
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा

वनजमिनीतील मातीची चोरी

By admin | Updated: May 15, 2016 01:07 IST

दहिसर-मनोर वनपालक्षेत्र परिसरात येणाऱ्या हतोली-बोट नदीकाठी असलेली वन जमिनीतील लाखो ब्रास माती उतखन्नन झाल्याची बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच एक ब्रास माती भरलेला

मनोर : दहिसर-मनोर वनपालक्षेत्र परिसरात येणाऱ्या हतोली-बोट नदीकाठी असलेली वन जमिनीतील लाखो ब्रास माती उतखन्नन झाल्याची बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच एक ब्रास माती भरलेला ट्रॅक्टर दिखाव्यासाठी वनविभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पकडून दोन आदिवासी मजुरांवर कारवाई केली बाकी लाखो ब्रास माती कुठे गेली? त्याची चौकशी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांची करावी अशी मागणी हतोली बोट गावातील नागरिक करीत आहेत.दहिसरतर्फे मनोर वनपाल क्षेत्र अंतर्गत येणारे हतोली बोट येथील वनविभागचे जमिनीतील माती उतखन्नन केली जात होती. आतापर्यंत लाखो ब्रास माती वीटभट्टी व भरावासाठी राजसोसपणे वन अधिकारी व कर्मचारी यांच्या नाकावर टिच्चून लंपास केली हा प्रकार गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. तरी सुद्धा कारवाई शून्य होती. मात्र लोकमत वृत्तपत्राने दखल घेऊन बातमी प्रसिद्ध करताच उपवनसहायक वनरक्षक कुंपते पालघर वनक्षेत्रपाल प्रियंका शिंदे व इतर अधिकारी खडबडून जागे झाले त्यांनी हातोली येथे वनजमिनीतून माती भरत असलेल्या ट्रॅक्टरला पकडले त्यावरील बिगारी काम करणाऱ्या दोन मजूरांवर कारवाई केली ट्रॅक्टर जप्त केला आहे. गेल्या दोन महिन्या अगोदर वनजमिनीच्या जागेत सक्शनपंप लावून रेती काढली जात होती. त्या वेळी मोजके पंप पकडण्यात आले होते. कारण रात्री येथून सक्शन पंप गायब करण्यात आले. आमच्या जवळ साधने नसल्यामुळे आम्हाला ते पंप जप्त करता आले नाही गावकऱ्यांनी ते पळविले असे उत्तर त्या वेळी उपसहायक वनरक्षक कुपते यांनी दिले होते सक्शन पंप पकडले होते त्या वेळी वनविभागाचे हतोली येथील गेस्ट हाऊसला प्रियंका शिंदे व कर्मचारी व गावकरी यांची मोठी मिटिंग झाली होती व त्या मिटिंगमध्ये मांडवली झाली अशी चर्चा होती त्यामुळेच शून्य कारवाई झाल्याचे स्पष्ट झाले. (वार्ताहर)