शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस, तुडतुड्याने मोहोर खाल्ला; आंबा बागायतदारांची झोप उडाली! अवकाळीमुळे आंबा पीक अडचणीत

By निखिल म्हात्रे | Updated: March 8, 2024 11:17 IST

आंबा उत्पादनावर परिणाम होऊन तुडतुड्या, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाला आहे.

अलिबाग : जिल्ह्यातील अनेक भागांत मागील शुक्रवारी सकाळी अवकाळी पाऊस कोसळला होता. या पावसामुळे आंब्याचा फुललेला मोहर काळा पडण्याची शक्यता आहे. त्याचा आंबा उत्पादनावर परिणाम होऊन तुडतुड्या, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाला आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे १४ हजार हेक्टर आंबा लागवडीचे क्षेत्र आहे. त्यात आंबा उत्पादनाचे साडेबारा हजार हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात ५० हजारांहून अधिक आंबा उत्पादक शेतकरी आहेत. या उत्पादनातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत आहे. रायगड जिल्ह्यातील काही आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच वाशी मार्केटमध्ये तयार आंबा विक्रीस नेला असला तरी बहुतांश बागायतदारांच्या बागेतील कलमे अद्याप मोहरत आहेत.

मोहर टिकवण्यासाठी त्यावर करावी लागणारी औषध फवारणी व अन्य उपाययोजना करूनही फलधारणा कशी होते, याकडे बागायतदारांचे लक्ष लागले असताना, पुन्हा एकदा पडलेल्या अवकाळीमुळे पिकाला धोका निर्माण झाला आहे. परिणामी, यावर्षी उत्पादन लांबणीवर पडणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात घट होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे.काही बागांमध्ये आंब्याला मोहर येत आहे, तर काही ठिकाणी कैरी तयार होण्याबरोबरच आंबेदेखील तयार झाले आहेत; परंतु आठवड्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे तुडतुड्या, बुरशीजन्य रोग येण्याची भीती आहे. त्यामुळे दहा टक्के उत्पादन घटण्याची शक्यता आहे.- चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघअवकाळी पाऊस फारच कमी पडला आहे. त्यामुळे आंबा उत्पादनावर परिणाम होणार नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वी आलेले मोहर गळून पडेल; परंतु शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये.- उज्ज्वला बाणखेले, अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी