शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक झाली, आता गाव पातळीवरील निवडणुकीचे वेध!

By निखिल म्हात्रे | Updated: June 28, 2024 13:00 IST

डिसेंबर अखेरपर्यंत २४० ग्रामपंचायतींची मुदत संपणार.

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : रायगड जिल्ह्यातील तब्बल २४० ग्रामपंचायतींची मुदत या वर्षाच्या डिसेंबर अखेरपर्यंत संपणार आहे. मात्र लोकसभा निवडणूक कार्यक्रमामुळे या ठिकाणी निवडणुका झाल्या नसल्याने ग्रामपातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यासाठी त्यांनी जोरदार तयारीही केली आहे.

२०२४ या वर्षाचे पहिले सहा महिने लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीने ढवळून निघाले. आता पावसाळा सुरू असतानाच ग्रामपंचायत निवडणुकांचे वेध लागले आहेत. १ जानेवारीपासून ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान जिल्ह्यातील २४० ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यात अलिबाग तालुक्यात ३४, पेण १८, उरण ८, मुरुड ४, कर्जत ३०, खालापूर ३, रोहा २६, तळा १८, म्हसळा ११, सुधागड ६, पनवेल १५, माणगाव २१, महाड ३० आणि श्रीवर्धन १६ अशा १४ तालुक्यांतील एकूण २४० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणुकांना मुहूर्त कधी?अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणूक झाली नसल्याने तेथे प्रशासक राजवट लावण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील २४० पैकी बहुतांश ग्रामपंचायतींवर प्रशासक आहेत. तर उर्वरित ग्रामपंचायतींवर पुढील काळात प्रशासक बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामपंचायत निवडणुकांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे गावा-गावांतील नेते आणि कार्यकर्त्यांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी आधीपासून सुरुवात केलेली आहे. आता पावसाळ्यात ग्रामपंचायत निवडणुका घेणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या सप्टेंबरअखेर किंवा विधानसभा निवडणुकांनंतरच या निवडणुकांना मुहूर्त लागेल असे सांगितले जात आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक 2024