शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंचा बंगला ज्या कोर्लईत, तिथले इतीवृत्त झाले गायब..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 09:51 IST

कोर्लई ग्रामपंचायतीमधील जून २०११ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीतील मासिक सभेचे इतिवृत्त आणि महत्त्वाची कागदपत्रे गहाळ

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या मालकीच्या कथित बंगल्याच्या प्रकरणापासून चर्चेत आलेल्या कोर्लई ग्रामपंचायतीमधील जून २०११ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत झालेल्या मासिक सभेचे इतिवृत्त आणि महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याची बाब समोर आली आहे. त्याबाबतच्या कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी  मंगळवारी  जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन ग्रामपंचायतीचे दप्तर धुंडाळण्यात येत होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंत सर्वजण या कामात गर्क होते.

याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मुरुड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रायगड जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे कोर्लई ग्रामपंचायतीच्या कागदपत्राची तपासणी करण्यात गर्क झालेले आहेत. या गहाळ कागदपत्रांमुळे  ठाकरे  यांच्या मालकीच्या कथित बंगले प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. कोर्लई ग्रामपंचायत हद्दीत उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार वायकर याच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे ९ एकर जमीन घेतलेली आहे. याबाबत किरीट सोमय्या यांनी या जमिनीवर १९ बंगले असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात तत्कालीन सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटकही झाली होती. मात्र, आता जून २०११ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत झालेल्या मासिक सभांचे इतिवृत्त आणि कागदपत्रे गहाळ झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.  

 

टॅग्स :Raigadरायगड