शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग येथील बैठकीला वरिष्ठ नेत्यांचीच पाठ

By admin | Updated: July 17, 2017 01:22 IST

भाजपाच्या युवा मोर्चाच्या वतीने अलिबाग येथे आयोजित केलेल्या बैठकीला वरिष्ठ नेत्यांनीच पाठ फिरविल्याने कार्यकर्त्यांचा

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : भाजपाच्या युवा मोर्चाच्या वतीने अलिबाग येथे आयोजित केलेल्या बैठकीला वरिष्ठ नेत्यांनीच पाठ फिरविल्याने कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला. समारोपाच्या सत्राला भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी हजेरी लावली.जिल्ह्यात युवा मोर्चाची कार्यव्याप्ती वाढविण्यासाठी जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, युवती प्रमुख, युवती सहप्रमुख, तालुका मंडलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, युवती प्रमुख, शहर अध्यक्ष, शहर सरचिटणीस यांची बैठक रविवारी हॉटेल रविकिरण येथे घेण्यात आली. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी व संघटनेचे बळकटीकरण करण्यासाठी भाजपाचे गृहनिर्माण तथा रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष हे वरिष्ठ नेते भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार होते. मात्र तेच या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण होते. त्यामुळे उपस्थित असलेल्या नेत्यांनीच युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मात्र वरिष्ठांच्या अनमोल मार्गदर्शनाविनाच त्यांना घरी परतावे लागले. यावेळी रायगड जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्र ांत पाटील, विजय चव्हाण अन्य पदाधिकारी उपस्थित होते.