शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅपवरील वादग्रस्त पोस्टमुळे तणाव

By admin | Updated: March 18, 2017 04:00 IST

खोपोली शहरात वादग्रस्त व्हॉट्सअ‍ॅप पोस्टवरून समस्त शिवप्रेमींचा संताप अनावर झाला. ही पोस्ट येथील केएमसी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे प्राध्यापक सुनील

वावोशी : खोपोली शहरात वादग्रस्त व्हॉट्सअ‍ॅप पोस्टवरून समस्त शिवप्रेमींचा संताप अनावर झाला. ही पोस्ट येथील केएमसी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे प्राध्यापक सुनील वाघमारे यांची असल्याचे स्पष्ट झाल्याने मोठ्या संख्येत शिवप्रेमींनी महाविद्यालयावर चाल करून संताप व्यक्त केला. वातावरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच महाविद्यालयात पोलिसांनी धाव घेत, वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी प्राध्यापक सुनील वाघमारे याला ताब्यात घेतले. तसेच संस्थेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी सुनील वाघमारे याला तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.शुक्र वारी सकाळपासून शिवाजी महाराजांच्या दोन जयंतीबाबत एक वादग्रस्त व्हॉट्सअ‍ॅप पोस्ट फिरत होती. अधिक तपासानंतर संताप निर्माण करणारी ती पोस्ट येथील केएमसी महाविद्यालयातील प्राध्यापक सुनील वाघमारे यांनी टाकली असल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची माहिती खोपोली शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने हजारो शिवप्रेमींनी महाविद्यालयात धाव घेतली. याबाबत जाब मागितला व तीव्र संताप व्यक्त करून प्राध्यापक वाघमारेवर कारवाई करा, नाहीतर आम्ही काय करायचे ते करतो, अशा घोषणा देत प्राध्यापक वाघमारे यांना जनतेच्या ताब्यात देण्याची मागणी केली. स्थिती अत्यंत नाजूक झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करीत प्राध्यापक सुनील वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याही ठिकाणी शिवप्रेमी नागरिकांची प्रचंड गर्दी होऊन प्राध्यापक वाघमारेला जनतेच्या ताब्यात द्या, अशा घोषणा सुरू झाल्या. तासाभरानंतर तणावाचे वातावरण व संतप्त जमावाला शांत करण्यात पोलिसांना यश आले. याबाबत प्राध्यापक वाघमारे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संस्थेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी प्रसंगाचे गांभीर्य बघून प्राध्यापक सुनील वाघमारे याला तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. (वार्ताहर) शिवप्रेमी, राजकीय नेत्यांनी के ला निषेधछत्रपती शिवाजी महाराजांबाबत अश्लील व वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या प्रा.सुनील वाघमारेवर कडक कारवाईची मागणीसाठी खोपोलीतील हजारो शिवप्रेमी व विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांनी के ली. शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत पोलीस स्टेशन आवारात ठाण मांडून निषेध व्यक्त के ला.