शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमध्ये गॅस वाहतुकीसाठी टेम्पोला एक दिवस परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 00:18 IST

किमान आठवड्यातून तीन दिवस मालवाहतुकीच्या टेम्पोला परवानगी देण्याची मागणी जोर धरत आहे.

मुकुंद रांजणेमाथेरान : पूर्वीपासूनच वाहतुकीच्या गहन समस्येत गुरफटलेल्या माथेरानमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार खूपच उशिराने का होईना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दस्तुरीपासून माथेरानपर्यंत टेम्पोला गॅस वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने माथेरानला आठवड्यातून तीन दिवस टेम्पो वाहतुकीचे आदेश दिले आहेत. तरीदेखील जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केवळ एकच दिवस तेसुद्धा गॅस सिलिंडरच्या वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. येथे नियमितपणे आठवड्याला २४० ते २५० गॅस सिलिंडरची गरज आहे. एका टेम्पोत ७० ते ८० टाक्या येऊ शकतात, त्यामुळे बाकी टाक्यांसाठी पुन्हा मालवाहू घोड्यांचा वापर करावा लागेल व १०० ते १५० रुपये जास्त द्यावे लागतील. हे नागरिकांना परवडण्यासारखे नाही. त्यामुळे किमान आठवड्यातून तीन दिवस मालवाहतुकीच्या टेम्पोला परवानगी देण्याची मागणी जोर धरत आहे.मुंबई उच्च न्यायालयाने १६ मे रोजी दिलेल्या निकालानुसार आठवड्यातून तीन वेळा माथेरानमध्ये गॅस सिलिंडरसाठी परवानगी देण्यात यावी, असे स्पष्ट केले आहे. एकीकडे या गावावर पूर्वीपासून असलेले ब्रिटिशकालीन जाचक नियम व अटीचे निर्बंध घातले गेले आहेत. राज्यात नव्हे तर देशात असे हे एकमेव पर्यटनस्थळ असावे की जे आजही वाहतुकीच्या गहन समस्येत गुरफटून गेले आहे. गाव तिथे रस्ता हे शासनाचे घोषवाक्य असताना येथे आजही मानवचलित हातगाडीवर सामानाची वाहतूक केली जात आहे. शासन पर्यटनस्थळांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना या विकासापासून दूर असलेल्या गावात कुठल्याही प्रकारची सोयीस्कर आणि स्वस्त दरात उपलब्ध होणारी व्यवस्था निर्माण करण्यात आलेली नाही.सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी यासाठी वारंवार पाठपुरावा केला असून येथील सर्वसामान्य लोकांना स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी टेम्पोशिवाय पर्याय नाही. मात्र परवानगीमध्ये स्पष्ट नमूद केले आहे की, आठवड्यातून फक्त एक दिवस तेही गॅस वाहतुकीसाठी परवानगी, अन्य सामानाच्या वाहतुकीसाठी ट्रेनच्या मालगाडीमधून वाहतूक करण्यात यावी; परंतु जगात कुठेही नाही अशा प्रकारे काही दिवसांपूर्वी मालगाडी सुरू करण्यात आली होती की ज्या गाडीत पाच प्रवासी बोगी अन् दोन बंद मालाच्या बोगी आहेत. त्यामुळे त्या गाडीतून वाहतूक करताना खूपच त्रासदायक आणि खर्चीक बाब बनली होती. ही मालवाहतूक गाडी रेल्वेने ३ जूनपासून बंद केली आहे.>न्यायालयात याचिका दाखलमाथेरानच्या वाहतूक व्यवस्थेत बदल घडण्याच्या दृष्टीने हे पहिले ऐतिहासिक पाऊल आहे. नुकत्याच झालेल्या न्यायालयातील सुनावणी दरम्यान वकील गौरव पारकर यांनी फार प्रभावीरीत्या वस्तुस्थिती न्यायालयासमोर मांडली व घोड्यांचा जीव धोक्यात घालून गॅसची वाहतूक करावी लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले. उशिरा का होईना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी टेम्पोला परवानगी दिली आहे. टप्प्याटप्प्याने वाहतूक व्यवस्था बदलण्यास सुरुवात झाली आहे. माजी आमदार सुरेशभाऊ लाड व अजय सावंत यांनी याचिका दाखल केल्याने या बदलाला सुरुवात झाली आहे. याचप्रमाणे प्राणीप्रेमी सुमी कुंजू सुब्रमण्यम यांनी अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड नवी दिल्ली यांच्या माध्यमातून गॅस टाक्यांची घोड्यांवरून होणारी वाहतूक थांबवावी या पाठपुराव्याचाही फायदा झाला आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी दिली.निदान माथेरानमधील एकंदरीतच भौगोलिक परिस्थितीचा साधकबाधक विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्यातून तीन दिवस टेम्पोला परवानगी देणे आवश्यक आहे, असे नागरिकांमधून बोलले जात आहे.