शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

गुरे घेऊन जाणारा टेम्पो गोरक्षकांनी कर्जतमध्ये पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 05:55 IST

गुरे घेऊन जाणारा टेम्पो गोरक्षक व पोलीस यांच्या मदतीने रविवारी पकडला.

कर्जत : गुरे घेऊन जाणारा टेम्पो गोरक्षक व पोलीस यांच्या मदतीने रविवारी पकडला. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.जनावरांना कर्जत येथील गो शाळेत ठेवण्यात आले आहे.कर्जत तालुक्यातील ममदापुर येथे कत्तलखाना असल्याचे बोलले जाते. २६ मे रोजी या कत्तलखान्यात गुरे घेऊन जाण्यात येणार असल्याची माहिती कर्जतच्या गोरक्षक कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी चार फाटा येथील वाहतूक पोलीस शरद फरांदे यांना ही माहिती दिली. साधारण रात्री १०.४० वाजण्याच्या सुमारास पळसदरी - कर्जतमार्गे नेरळ परिसरात जाणारा गुरांनी भरलेला एम.एच.०६ ए जी ४१७९ या क्रमांकाचा टेम्पो कर्जतचार फाटा येथे आला. त्यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहाथ पकडून त्यातील दोन गाई व चार बैल कर्जत पोलिसांच्या हवाली केले.त्यानंतर मात्र गुन्हा नोंद करण्यात गुरांचा वाहतुक परवाना, गुर विकणाऱ्या शेतक-याचे संमती पत्र, वाहनाची सर्व माहिती तसेच देणाºया - घेणाऱ्यांची सखोल चौकशी करुन पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी नेरळ दामत येथील सुफियान सिराज नजे (३८ )याला ताब्यात घेतले.त्याच्याकडे गुरे घेऊन जाण्याबाबत कोणतीही कागदपत्र नसल्याने कर्जत पोलीस ठाण्यात रात्री साडे दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. टेम्पो आणि गुरे असा १ लाख ९० हजार रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान दाटीवाटीने कोंबून भरलेल्या गुरांना कर्जतच्या गोशाळेत पाठविण्यात आले.