शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी संघटीत होणे गरजेचे

By admin | Updated: January 23, 2017 05:39 IST

महाराष्ट्रात शिक्षकांना शासनाच्या विविध जाचक निर्णयामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध पदाधिकाऱ्यांकडून अपमानीत

बोर्ली -मांडला/मुरुड : महाराष्ट्रात शिक्षकांना शासनाच्या विविध जाचक निर्णयामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध पदाधिकाऱ्यांकडून अपमानीत व्हावे लागत आहे. ही परिस्थिती बदलवून आपला मान सन्मान टिकवायचा असेल तर संघिटत होणे गरजेचे आहे असे प्रतिप्रादन कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुरु ड तालुक्यातील नांदगाव येथे प्रचार प्रसंगी केले. भारत देशाची उज्वल पिढी घडविण्यासाठी शिक्षक हे जीवाचा आटापीटा करून प्रामाणिक कामकारीत सेवा करत आहेत. मात्र महाराष्ट्रात शिक्षक बांधवांची नवनवीन शासन आदेशामुळे चिंताग्रस्त, विनाअनुदानित शाळा, स्वयंअर्थसहाय्यत शाळा,अ शैक्षणिक कामे आदींमुळे मानिसक तणाव वाढत आहे. पुढे ही भविष्याची शाश्वती नाही, अशी परिस्थिती राहिल्यास आपण आपल्या मुलांना शिक्षक कधीच बनवू शकणार नाही. विद्यार्थ्यांनाही शिक्षक बनण्याचा सल्लाही देऊ शकणार नाही. शिक्षण मंत्री विनोद तावडे हे म्हणतात की, यापुढे शाळेचा सर्व कारभार आॅनलाईन होणार आहे. आणि ज्यांना ते जमणार नाही त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घ्यावी. या सर्व गोष्टी बदलणे ही काळाची गरज आहे. विना अनुदानित शाळांना देण्यासाठीसुमारे १३३ आंदोलने करावी लागली. त्याच वेळी महाराष्ट्रात देखील आंदोलन सुरु होती. त्या वेळी जाफ्राबाद(जालना) या ठिकाणच्या गजानन खरात नावाच्या शिक्षकाचा हृदयविकाराने बळी गेला. तरी शासनाने न्याय दिला नाही. विना वेतन काम करणार्या शिक्षणाच्या व्यथा गंभीर आहेत. त्यावेळी शिक्षक यांचा उद्रेक पाहून त्यावेळी शिक्षक मंत्री यांनी २० टक्के अनुदान देण्याचे आश्वासन दिले मात्र ते आश्वासन हवेत विरले गेले. १९ सप्टेंबर २०१६ रोजी या विनाअनुदानीत शाळांना अनुदान देण्याचा शासन निर्णय जाहीर झाला. त्यात सुद्धा जाचक अटी होत्या. त्यातील प्रमुख आट म्हणजे नववी आणि दहावीचा निकाल हा १०० टक्के लागला पाहिजे. बायोमेट्रिक विद्यार्थी आणि शिक्षक हजेरी यंत्र पाहिजे. तरच २० टक्के अनुदान मिळणार आदी जाचक गोष्टींचा शासनदेश आला. याचा धसका अनेक शिक्षकांनी घेतला. शाळा वाचवा शिक्षक वाचवा आणि आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी सर्व शिक्षकांनी मिळून लढू या असेही आव्हान यावेळी त्यांनी केले. यावेळी म्हात्रे यांनी माजी जिल्हा प्रमुख तथा रायगड जिल्हा परिषदेचे प्रतोद महेंद्र दळवी यांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. (वार्ताहर)