शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

सातवेळा लढलेल्या गीतेंपुढे तटकरेंचे कडवे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 05:31 IST

शिवसेना-राष्ट्रवादीत संघर्ष । विकास आणि रोजगार ठरतोय कळीचा मुद्दा

लोकसभा निवडणुकांत गेल्या वेळी मोदी लाटेत केवळ २,११० मताधिक्याने विजयी झालेले रायगडचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते या वेळी कोकणात सातव्यांदा आणि रायगडमध्ये तिसऱ्यांदा निवडणूक रिंंगणात उतरले आहेत. भाजपबरोबर दिलजमाईत त्यांना यश आले आहे. कुणबी मतांच्या आधारे या वेळीही गीते विजयी होणार असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. यंदाच्या प्रचारात आघाडीच्या उमेदवारांना लक्ष्य करत ते टीकास्त्र सोडत आहेत. गाव पातळीपासून त्यांनी प्रचार केला असला, तरी प्रस्थापितांविरोधातील नाराजी आणि तटकरे यांनी लावलेला जोर यामुळे त्यांच्यासमोरील आव्हान नेहमीपेक्षा कडवे आहे.गेल्या वेळी मोदी लाट असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी रायगड मतदारसंघात निकराची लढत दिली होती. निसटत्या पराभवातून बोध येत या वेळी त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांची समजूत काढत, मित्रपक्षांत भर घालत जमेल तेवढी बाजू भक्कम केली आहे. विकास, रोजगार या मुद्द्यांवरून आक्रमक प्रचार करताना गीतेंना केंद्रात मंत्रिपद मिळूनही त्याचा रायगडच्या विकासाला फायदा झाला नसल्याचा मुद्दा रेटून धरला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, दोन वेळा मंत्रिपदी काम करताना केलेल्या कामांचा संदर्भ ते देत आहेत. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष निकराचा झाला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या ‘स्किल इंडिया’धोरणांतर्गत केंद्रीय अवजड उद्योग खात्याच्या माध्यमातून या मतदारसंघात नवे-मोठे उद्योग येतील आणि रोजगार उपलब्ध होतील, अशी अपेक्षा होती. मात्र रायगडमध्ये एकही कारखाना आला नाही. पाच वर्षांत केवळ ५.९८ टक्के बेरोजगारांना रोजगार मिळाल्याची आकडेवारी समोर आल्याने नवमतदार आणि तरुण मतदारांत मोठी नाराजी आहे.रायगड लोकसभा मतदारसंघातील गेल्या १० वर्षांच्या खासदारकीच्या काळात भाजपला सोबत घेत शिवसेनेकडून एकही उपक्रम न राबविल्याने त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद मावळलेली नाही. त्यामुळे सध्या गीते सातत्याने संपर्कात राहून नाराजी दूर करीत आहेत.
उमेदवारी निश्चित होताच तटकरेंनी रायगडमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नाराजी दूर करण्यावर भर दिला. महाडमध्ये जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माणिक जगताप, अलिबागमध्ये मधुकर ठाकूर, चिपळूणमध्ये आ. भास्कर जाधव यांच्याशी दिलजमाई झाल्याने एरव्ही उद््भवणारे पक्ष किंवा आघाडीअंतर्गत वाद फारसे उरले नाहीत.

२००९ मध्ये शेतकरी कामगार पक्ष अनंत गीतेंसोबत होता. तेव्हा ते विजयी झाले. २०१४मध्ये शेकापने रमेश कदम या आयात व्यक्तीला उमेदवारी दिली. त्यांचा पराभव झाला. परंतु त्यांना एक लाख २९ हजार ७३० मते मिळाली. आता शेकाप तटकरेंसोबत आहे. त्या पक्षाला मानणारा वर्ग पाहता ही जमेची बाजू मानली जाते.
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचा मुद्दा रेंगाळला आहे. अलिबाग हे जिल्हा मुख्यालय कोकण रेल्वे मार्गास जोडण्याच्या प्रकल्पाचे आश्वासन प्रत्यक्षात उतरू शकलेले नाही. तेथील लोकल सेवाही रखडली आहे. औद्योगिक जिल्हा म्हणून या जिल्ह्याला ज्या पायाभूत सुविधा मिळणे अपेक्षित होते, त्याही पूर्णत्वास गेल्या नाहीत. बंदरांचा विकास रखडला. याची उत्तरे गीतेंकडून मागितली जात आहेत. केंद्रातील मंत्रिपदाचा रायगडच्या विकासाला, तेथील बेरोजगारी दूर करण्याला काय फायदा मिळाला, हाही प्रचारातील मुद्दा बनला आहे.पेणमध्ये काँग्रेस पक्षात फूट पाडत भाजपने पनवेलबाहेर विस्ताराचे पाऊल टाकले. त्याचवेळी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची मनीषा बाळगणाºया नावेद अंतुले यांना शिवसेनेने पक्षप्रवेश दिला. त्याअगोदर अंतुलेंवरील अन्यायाचा मुद्दा चर्चेत आला. या प्रवेशातून आपल्या मतांचा पाया विस्तारण्याचा प्रयत्न गीते यांनी केला. सध्या नाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी तेथील नवनगराची जागा निश्चित झाल्याचे सांगितले जाते, पण तो मुद्दा प्रचारात हवा तितका अद्याप तापलेला नाही.मागील निवडणुकीत गीते यांनी पेण, महाड, दापोली या मतदारसंघांत मताधिक्य मिळविले होते. ते टिकवून ठेवताना अन्य तीन मतदारसंघांत तटकरे यांच्याशी लढत देण्याचे आव्हान गीतेंसमोर आहे. रत्नागिरी जिल्ह्यावर पकड असल्याचे ते मानतात. ते त्यांना सिद्ध करून दाखवावे लागेल.

२०१४च्या निवडणुकीत मोदी लाटेतही तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातील अलिबाग, श्रीवर्धन, गुहागर विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळविले होते. त्यामुळे ते वगळता अन्य तीन मतदारसंघांवर त्यांनी अधिक लक्ष दिले आहे.

टॅग्स :raigad-pcरायगडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक