शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चवदार तळ्यातील पाणी होणार चवदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 02:50 IST

चवदार तळ्यातील पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी शासन एक कोटी ३७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत केली.

महाड : चवदार तळ्यातील पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी शासन एक कोटी ३७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत केली. यामुळे महाड नगरपरिषदेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.बुधवारी मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या संदर्भात बैठक बोलावली होती. त्या बैठकीत त्यांनी ही घोषण केली. या बैठकीस भदन्त राहुल बोधी, आ. प्रशांत ठाकूर, आ. भरत गोगावले, आ. पंडित पाटील, आ. प्रवीण दरेकर, माजी आमदार माणिकराव जगताप, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्यासह आंबेडकरी संघटनांचे नेते, तसेच शासनाच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.एम.जी.पी.ने तयार केलेला हा जलशुद्धीकरण आराखडा एक कोटी ३७ लाख रु पयांचा असून, त्यामध्ये चवदार तळ्यातील गाळ काढून अल्ट्रा व्हायलेट सिस्टीमद्वारे पाणी शुद्ध करणे, तळ्यात मध्ये मध्ये एरियारेटर बसविणे, गटार लाइन बांधणे, जे भीमसैनिक लांबून येतात, ते तळ्याचे पाणी आपल्यासोबत घेऊन जातात, त्यांच्यासाठी स्टँडपोस्ट (नळ) उभारणे आदी कामे या निधीतून करणार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. या वेळी माजी आमदार माणिकराव जगताप यांनी अमृतसर येथील सुवर्णमंदिरासारखे, चवदार तळ्याचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी करीत, शासनाने हा जलशुद्धीकरणाचा निधी त्वरित द्यावा, अशी मागणी केली. आ. भरत गोगावले यांनीही हा जलशुद्धीकरण कामाचा निधी शासनाने लवकरात लवकर द्यावा, अशी मागणी केली.