शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वादळात नुकसान होऊनही मदत मिळत नसल्याने टपरीधारकांत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 01:16 IST

सोमवारी मुख्याधिकाऱ्यांना भेटणार : तोडगा न निघाल्यास आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क मुरुड : ३ जूनला झालेल्या चक्रीवादळात  समुद्रकिनारी असणाऱ्या ६० टपरीधारकांचे अतोनात नुकसान होऊनसुद्धा शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत न मिळाल्यामुळे सर्व गरीब टपरीधारक चिंतेत व कर्जबाजारी झाले आहेत. समुद्रकिनारी असणाऱ्या टपरीधारकांना मदत मिळावी यासाठी पदमदुर्ग व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर  यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्या वेळी उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांच्या मध्यस्थीने मुरुड नगर परिषदेकडून वार्षिक भाड्यात सूट देण्याचे वचन देण्यात आले होते. या सभेत मुरुड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमित पंडितसुद्धा उपस्थित होते. आश्वासन देऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटूनसुद्धा अद्यापपर्यंत मुरूड नगर परिषदेकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील टपरीधारक चिंताग्रस्त झाले आहेत. 

आमच्या टपऱ्या या कायमस्वरूपी नसून फक्त आम्ही व्यवसाय करीत आहोत. आमचे कोणतेही पक्के बांधकाम नाही. हातगाडीवर चालणारा आमचा व्यवसाय असताना आम्ही सीआरझेडमध्ये आहोत म्हणून मदत न मिळणे हे योग्य नसल्याचे मत या वेळी गायकर यांनी व्यक्त केले होते. सीआरझेड पक्के बांधकाम व घर असेल तरच लागू होणार आहे. हातगाडीवर धंदा करणाऱ्यांना कसला सीआरझेड कायदा लावता, असा प्रश्नसुद्धा अरविंद  गायकर यांनी प्रशासनाला विचारला होता. परंतु मदत देता येणार नाही या गोष्टीवर प्रशासन ठाम राहिल्याने अखेरच्या क्षणी मुरुड नगर परिषदेकडून वार्षिक भाड्यात सूट देण्याचे ठरवण्यात आले होते. मुख्याधिकारी अमित पंडित यांनी सभागृहाला विचारून वार्षिक भाडेमाफीचा  निर्णय घेणार असल्याचे या वेळी सांगितले होते. परंतु आज दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी जाऊनसुद्धा भाडेमाफी झाली नसल्याने सर्वजण चिंताग्रस्त आहेत.याबाबत गायकर यांनी, मुरुड नगर परिषद एक वर्षाचे आठ हजार रुपये भाडेमाफी देणार होती. परंतु त्यांनी अद्यापपर्यंत मला कोणतेही उत्तर दिलेले नाही. सोमवारी सर्व टपरीधारकांसमवेत मुख्याधिकारी यांची भेट घेणार आहोत. जर तोडगा निघाला नाही तर पुन्हा मी माझे आंदोलन करणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Raigadरायगड