शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टेंबरे ग्रामपंचायतीचे विभाजन, दोन ग्रामपंचायती अस्तित्वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 03:50 IST

ग्रामपंचायतीवर प्रशासक : विनीता सावंत ठरल्या ऐन घटकेच्या सरपंच

कर्जत : कर्जत तालुक्यात टेंभरे ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यामुळे रजपे आणि जांबरुं ग या दोन नव्या ग्रापंचायती अस्तित्वात आल्या आहेत. तशी अधिसूचना शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून काढण्यात आली आहे.तालुक्यात तीन हजार १७२ लोकसंख्या असलेली टेंभरे ग्रापंचायत होती. या ग्रामपंचायतीमध्ये टेंभरे, रजपे, शिंगढोळ, पेठ, जांबरुं ग या पाच गावांचा समावेश होता.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना काढण्यात आली असून, टेंभरे ग्रामपंचायतीच्या जागी रजपे आणि जांबरुं ग या दोन ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आहेत. रजपे ग्रामपंचायत रजपे, टेंभरे आणि शिंगढोळ या तीन गावांचा समावेश करण्यात आला आहे, तर जांबरुं ग ग्रामपंचायतीमध्ये जांबरुं ग आणि पेठ या दोन गावांचा समावेश आहे. टेंभरे ग्रामपंचायतीचे विभाजन करून रजपे आणि जांबरुं ग या दोन ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आहेत, अशी अधिसूचना शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून १६ आॅगस्ट रोजी काढण्यात आली आहे.

२४ आॅगस्ट रोजी गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी टेंभरे ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी सुनील अहिरे यांची नेमणूक केली आहे. त्यामुळे आजपासून पुढील काळापर्यंत ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या मार्फत चालणार आहे.टेंभरे ग्रामपंचायतीची निवडणूकच्२४ आॅगस्ट रोजी टेंभरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक लागली होती. या निवडणुकीसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच दीपाली प्रमोद पिंगळे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ते पद रिक्त झाले होते, त्यासाठी शनिवारी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंचपदासाठी एकमेव विनीता मंगेश सावंत यांचा अर्ज आल्याने त्या सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या. मात्र, ग्रामपंचायतीच्या विभाजनाची अधिसूचना आणि प्रशासकाची नेमणूक यामुळे विनीता सावंत ऐन घटकेच्या सरपंच ठरल्या आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRaigadरायगड