शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये स्वाईन फ्लूची साथ

By admin | Updated: August 15, 2015 22:50 IST

पनवेल शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांतच स्वाईन फ्लूची साथ नियंत्रणात आली असल्याचे वाटत असताना पुन्हा एकदा साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे.

पनवेल : पनवेल शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांतच स्वाईन फ्लूची साथ नियंत्रणात आली असल्याचे वाटत असताना पुन्हा एकदा साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. मागील दहा दिवसांत पनवेलमध्ये सहा रु ग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.सहा रु ग्णांपैकी चार रु ग्णांवर पनवेलमधील विविध रु ग्णालयांत उपचार सुरू असून यापैकी दोन रु ग्णांवर मुंबईतील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ग्रामीण रु ग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमल तांबडे, जयदीप सहस्रबुद्धे, उषा पेशिवार , नितीन म्हात्रे, प्रतीक्षा ठक्कर यांना आणि महाडमधील अमोल नावाच्या रु ग्णाला एच१एन१ चा संसर्ग झाला आहे. एक ते दोन महिन्यांपूर्वी पनवेलमध्ये एच१एन१ चे २० पेक्षा जास्त रु ग्ण पनवेलमध्ये आढळले होते. यामध्ये कामोठेमधील महिलेचा मृत्यू देखील झाला होता. हवामानाच्या सततच्या बदलामुळे पुन्हा एकदा स्वाईन फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पनवेल शहरात नगरपरिषदेमार्फत आरोग्य सेवा पुरविली जाते. तसेच ग्रामीण रु ग्णालयातून देखील शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविली जाते. मात्र खारघर, कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी, नवीन पनवेलमध्ये सिडकोमार्फत विविध सेवा पुरविल्या जातात. मात्र आरोग्य सेवेबाबत सिडको काही ठिकाणी कमी पडत असून सिडकोने या वसाहतीमध्ये रु ग्णालय सुरू केल्यास वसाहतीमधील नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.पनवेलमध्ये सहा रु ग्ण एच१एन१ चे बाधित असल्याचे चाचणीत उघड झाले आहे. नागरिकांनी या साथीच्या आजाराची लागण न होण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. तसेच घशात खवखव होणे, ताप येणे, डोके दुखणे, खोकला येणे, नाकातून पाणी गळती ही या आजाराची लक्षणे आहेत. कोणत्याही व्यक्तीला ही लक्षणे जाणवल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी. - बी. एस. लोहारे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, पनवेल.