शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये होणार जलतरण तलाव

By admin | Updated: December 11, 2015 01:24 IST

क्रीडा क्षेत्रातील नवोदित व उदयोन्मुख खेळात शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील किशोर व युवांसाठी स्वीमिंग या प्रकारात शास्त्रशुध्द व तंत्रशुध्द तेथे

पेण : क्रीडा क्षेत्रातील नवोदित व उदयोन्मुख खेळात शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील किशोर व युवांसाठी स्वीमिंग या प्रकारात शास्त्रशुध्द व तंत्रशुध्द तेथे क्रीडा नैपुण्य प्राप्त व्हावे, पेणमधील खेळाडूंनी स्वीमिंग प्रकारात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर धडक मारावी या क्रीडाप्रेमी हेतूने पेण पालिकेच्या २०१५-१६ या शतकोतर सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती कार्यक्रमाच्या अनुषंगाने, सव्वा कोटी खर्चाचा अपेक्षित जलतरण तलाव पेण पालिका प्रशासन साकारत आहे. त्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे.माजी कॅबिनेट मंत्री रवी पाटील यांच्या विकास कल्पनेतून नगराध्यक्षा प्रीतम पाटील व पालिका गटनेते अनिरुध्द पाटील यांच्या सहकाऱ्यांनी हा जलतरण तलाव पेण पालिका तयार करीत आहे. क्रीडा जगताचा सर्वत्र बोलबाला असल्याने ज्या देशाचे क्रीडाक्षेत्र मजबूत तो देश ताकदवान समजला जातो. आंतरराष्ट्रीय स्पर्धा, आॅलिम्पिक एशियाड व अन्य स्पर्धाबरोबर देशाअंतर्गत खेळल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धात पेणच्या नागरी व ग्रामीण उदयोन्मुख खेळाडूंना जाता यावे, यासाठी क्रीडाविषयक सोयी - सुविधावर भर द्यावा हा या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने पेण पालिका प्रशासनाचा हेतू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अल्पावधीत ही संकल्पना राबविली व त्याची त्याच शीघ्र गतीने अंमलबजावणी झाली असल्याचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले. पालिका प्रशासनाचा बांधकाम विभाग व अभियंता जागृती पवार व त्यांच्या टीमने जलद गतीने काम करून अल्पावधीत ही किमया साध्य केली आहे. यामुळे आज काम अंतिम टप्प्यात आले आहे. (वार्ताहर)