शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले रायगडावर उत्खननात सापडला स्वराज्याचा ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 02:45 IST

स्वराज्याची राजधानी म्हणून जगभरात कीर्ती असलेल्या किल्ले रायगडावर आता ऐतिहासिक ठेवा सापडण्यास सुरूवात झाली आहे.

संदीप जाधव  महाड : स्वराज्याची राजधानी म्हणून जगभरात कीर्ती असलेल्या किल्ले रायगडावर आता ऐतिहासिक ठेवा सापडण्यास सुरूवात झाली आहे. प्राधिकरणाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या किल्ले रायगडच्या संवर्धनाला आता सुरूवात झाली असून यासाठी होत असलेल्या शास्त्रीय उत्खननात शिवकालीन शस्त्रे अस्त्रे यांचे अवशेष तसेच शिवकालीन नाणी व अत्यंत दुर्मीळ अशा काही पुरातन वस्तू व वास्तूंचे अवशेष सापडू लागल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वराज्याच्या राजधानीत अवघ्या काही फुटांवर हा ऐतिहासिक ठेवा सापडू लागल्याने प्राधिकरणाचे अध्यक्ष व खासदार संभाजी राजे यांनी रविवारी गडाला भेट देऊन पाहणी केली.रायगडच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या अध्यक्षतेखाली एका स्वतंत्र प्राधिकरणाची नियुक्ती केल्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्व परवानगी घेऊन संवर्धनाच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. सध्या रायगडावर डेक्कन विद्यापीठाच्या देखरेखीखाली काही ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने उत्खनन सुरू आहे. काही मोजकी ठिकाणे यासाठी निवडण्यात आली आहेत. साधारणत: दीड ते दोन फुटांपर्यंत उत्खनन केल्यानंतर शिवकालीन शस्त्रे अस्त्रे यांचे अवशेष, शिवकालीन नाणी, त्या काळात वापरल्या जाणाऱ्या बंदुकीतील गोळी, तोफेचे अवशेष, नक्षीदार मातीची मडकी, चिनीमातीच्या भांड्यांचे तुकडे, त्याकाळातील विटा, कौले त्याच बरोबर तोफगोळे, शिवकालीन घराच्या दरवाजांचे कडी-कोयंडे, कुलूप, दगडी दिवा, पाटा वरवंटा, तांब्याच्या वस्तू आणि आणखी बरेच काही ऐतिहासिक वस्तू सापडत आहेत. पुणे येथील डेक्कन विद्यापीठात पुरातत्व खात्याचे शिक्षण घेणारे दहा विद्यार्थी त्यांच्या पर्यवेक्षकांसोबत पंधरा दिवसांपासून गडावर दाखल झाले आहेत. संपूर्ण गडाची पाहणी केल्यानंतर काही मोजकीच ठिकाणे उत्खननासाठी निवडण्यात आली.यासाठी कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा किंवा अवजारांचा वापर केलेला नसून केवळ कुदळ, फावडी याच अवजारांचा वापर करण्यात आला आहे.उत्खननासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी, जगदीश्वर मंदिर आणि वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरतीही शास्त्रीय पध्दतीने रासायनिक प्रक्रि या सुरू आहे. औरंगाबाद येथील पुरातत्वीय विभागाचे सहअधीक्षक यासाठी रायगड किल्ल्यावर तळ ठोकून बसले आहेत. कोकणात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या पुरातन वास्तूंना धोका निर्माण होऊ शकतो. दगडी भिंतीवर शेवाळ तयार होऊन दुरवस्था होऊ नये यासाठीची खबरदारी म्हणून ही प्रक्रि या करण्यात आली असून तिचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.प्राधिकरणाचे अध्यक्ष व खासदार संभाजी राजे यांनी आज किल्ले रायगडला भेट देऊन प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. पुणे येथील डेक्कन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले.गडावर सापडत असलेल्या ऐतिहासिक वस्तू तसेच वास्तूंचे महत्त्व पहाता आणखी प्रमाणात उत्खनन झाल्यास फार मोठी दौलत शिवप्रेमींना सापडू शकते यासाठी वेळ पडल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करु , मात्र भारतीय पुरातत्व विभागाला विश्वासात घेऊनच योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.रायगड व परिसरातील एकवीस गावांच्या तपासणीकरिता हैद्राबाद येथून विशेष मॅप तपासणी टीमला पाचारण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.