शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ विषबाधा खव्याने झाल्याचा संशय

By admin | Updated: March 28, 2016 00:43 IST

महाड तालुक्यातील कुंबळे गावात लग्नाच्या जेवणात विषबाधा झाली होती. आतापर्यंत जवळपास दीडशेच्या वर रुग्णांना याची बाधा झाली आहे. या प्रकरणी अन्न औषध प्रशासन

- सिकंदर अनवारे,  दासगावमहाड तालुक्यातील कुंबळे गावात लग्नाच्या जेवणात विषबाधा झाली होती. आतापर्यंत जवळपास दीडशेच्या वर रुग्णांना याची बाधा झाली आहे. या प्रकरणी अन्न औषध प्रशासन विभागाच्या पथकाने महाडमध्ये धाव घेऊन येथील जेवणाचे नमुने ताब्यात घेतले आहेत. या ठिकाणी वापरण्यात आलेल्या खव्याची मुदत दोनच दिवसांपूर्वी संपली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सोशल मीडियावर स्थानिक नागरिकांनी खव्याच्या पाकिटाचे फोटो टाकल्यानंतर हा संशय निर्माण झाला आहे. या घटनेनंतर अन्न प्रशासन विभागाने महाडमधील महाबळेश्वर स्वीट मार्ट आणि ए वन कॅटरर्स या दोन्ही दुकानांची तपासणी केली.कुंबळे गावात जैन्नुद्दीन कादिरी यांच्या मुलाचा विवाहात राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील दिग्गजांची हजेरी होती. दुपारी लग्न सोहळा पार पडल्यानंतर मटणाची तसेच दुधी-हलव्याची दावत देण्यात आली. मात्र जेवण केल्यानंतर काही तासांतच जेवण केलेल्या पाहुण्यांना उलटीचा त्रास जाणवू लागला. विषबाधा झाल्याचे कळल्यानंतर कुंबळे आणि महाड परिसरातील जवळपास दोनशेच्या वर रुग्ण महाडमधील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. या घटनेनंतर महाडच्या उपविभागीय अधिकारी प्रांजल सोनवणे यांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणचे जेवणाचे नमुने त्यांनी ताब्यात घेतले. याबाबत अन्न औषध प्रशासन विभागाचे एक पथक महाडमध्ये दाखल झाले आहे. यामधील अन्न औषध विभागाचे अधिकारी आर. एस. बोडके, आर. बी. कुलकर्णी यांच्या पथकाने दोन्ही दुकानांची तपासणी केली. या वेळी महाड तालुका पोलिसांनी जप्त केलेले जेवणाचे नमुनेदेखील ताब्यात घेतले आहेत. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी महाडमधील ही दोन्ही दुकाने बंद केली. विषबाधा प्रकरणी जेवणाचे नमुने महाड पोलिसांकडून ताब्यात घेत असून, या नमुन्यांच्या तपासणी अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाईल.- आर. एस. बोडके, अन्न औषध प्रशासन अधिकारी