शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
2
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
3
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
4
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
5
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
6
काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
7
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
8
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
9
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
10
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
11
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
12
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
13
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
14
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
15
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
16
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
17
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
18
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
19
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
20
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?

हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर मैदानावरील बांधकामाला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:19 AM

हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर मैदानावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत कारवाई करावी, अशी मागणी बचाव समितीच्यावतीने करण्यात येत आहे.

कर्जत : हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर मैदानावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत कारवाई करावी, अशी मागणी बचाव समितीच्यावतीने करण्यात येत आहे. तसेच हे मैदान, मैदान म्हणून राहावे अशी मागणी जोर धरत होती. लोकभावनांचा विचार करून मुख्याधिकारी कर्जत नगरपरिषद यांनी बांधकाम करण्याचा अर्ज फेटाळून लावत, मैदानावर सुरू असलेल्या बांधकामाबाबत स्थगिती आदेश दिले आहेत.धर्मदाय आयुक्त व नगरपरिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रारी दाखल करण्यात आलेल्या होत्या. तसेच नागरिकांनी व विविध संस्थांनी याबाबत हरकती घेत सुस्थितीत असलेली व्यायामशाळा पाडण्यास व मैदानाच्या विकासास विरोध दर्शवला होता. त्याबाबत जनभावना व कायदेशीर बाबी लक्षात घेऊन मुख्याधिकारी कर्जत नगरपरिषद यांनी बांधकाम करण्याचा अर्ज फेटाळून लावला आहे व मैदानावर सुरू असलेल्या बांधकामाबाबत स्थगिती आदेश दिले आहेत. त्यामुळे सतत भूमिका बदलणाऱ्या कार्यकारी मंडळाला झटका बसला आहे. समितीचे समन्वयक वकील हृषीकेश जोशी यांनी आपले सरकार या पोर्टलवर अनधिकृत बांधकाम तयारी सुरु असल्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने कर्जत नगरपरिषदेमध्ये ईमेलद्वारे कागदपत्रे व पुरावे सादर केले होते. तसेच मुख्याधिकारी कर्जत नगरपरिषद यांना लीगल नोटीस पाठवली होती. या कारवाईबाबत जोशी यांनी तात्पुरत्या दिलाशाबद्दल समाधान व्यक्त केले. मैदानावर खेळणाºया लहान मुलांना वेठीस धरले व तिथे मैदानात परवानगी नसताना बांधकाम सुरू ठेवले म्हणून एम.आर.टी. पी. कायद्यानुसार कृत्यास जबाबदार व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ही जागा हे १८७२ सालापासूनचे मैदान असून इतर जागाप्रमाणे लिलावात न देता ते १९६६ साली सरकारने मैदान म्हणून दिले आहे.तहसील कार्यालयाने याबाबत अटी आणि शर्थी घालून हे मैदान संस्थेस कब्जाहक्काने दिले आहे. संस्थेने तहसीलदार यांच्या आदेशातील निहित अटी आणि शर्थीचा भंग केल्याने भविष्यात हे लोकांचे मैदान संस्थेकडेच राहिल्यास त्याचा परत गैरवापर होऊ शकेल याची भीती जनतेस असल्याने हे मैदान तातडीने शासनजमा करावे अशी मागणी बचाव समितीने जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे केली होती. व्यायामशाळा ही संस्थेच्या मालकीची नाही व ती संस्थेने विकत घेतली नसताना संस्थेने तिची खोटी मालकी कथन केली आहे. ती धोकादायक आहे असा खोटा दाखला कर्जत नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून संस्थेने दिला आहे असे वकील हृषीकेश जोशी यांचे म्हणणे आहे. कर्जतमधील अनेक बांधकाम घोटाळे समोर आले असताना ही जागा सुद्धा गिळंकृत करणार का? असा सवाल जनता आता विचारत आहे.या बांधकामास परवानगी नाकारण्यात आली आहे, याबाबत धर्मदाय कार्यालयातून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.- रामदास कोकरे, मुख्याधिकारी,कर्जत नगरपरिषद

टॅग्स :Raigadरायगड