शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुधागड कुपोषित बालकांच्या संख्येत दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 03:02 IST

सुधागड तालुक्यात काही दिवसांपूर्वी कुपोषित बालके आढळली आहेत. नुकतीच पाली तहसील कार्यालयातील हिरकणी कक्षात झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत या संदर्भात गंभीर दखल घेण्यात आली. समन्वय समितीचे अध्यक्ष राजेश मपारा व अन्य सदस्यांनी कुपोषणाच्या मुद्यावर संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.

पाली : सुधागड तालुक्यात काही दिवसांपूर्वी कुपोषित बालके आढळली आहेत. नुकतीच पाली तहसील कार्यालयातील हिरकणी कक्षात झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत या संदर्भात गंभीर दखल घेण्यात आली. समन्वय समितीचे अध्यक्ष राजेश मपारा व अन्य सदस्यांनी कुपोषणाच्या मुद्यावर संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. मुंबईतील डॉक्टर फॉर यू या संस्थेने सुधागड तालुक्यात नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ३२ मुले कुपोषित आढळल्याचा अहवाल दिला आहे. रायगड जिल्ह्यात कर्जतपाठोपाठ सुधागड तालुक्याचा कुपोषित बालकांच्या संख्येत दुसरा क्र मांक लागतो असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी एस.एस. कवितके यांनी कुपोषित बालकांची योग्यरीत्या तपासणी व त्यांना नियमित पोषक आहार पुरविला जात असून कुपोषित बालकांचे प्रमाण कमी झाले असल्याची माहिती दिली.यावेळी पोषण आहार या विषयावर सभापती साक्षी दिघे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत घरकूल योजनेत झालेल्या अनागोंदी कारभारावर देखील गदारोळ झाला. परशुराम कदम (रा.पुई) यांच्या नावे आलेल्या घरकुलाच्या निधीची रक्कम अन्य खातेदाराच्या खात्यात जमा होवून मूळ लाभार्थी वंचित राहिला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अशा प्रकारे घरकूल निधीपासून आजही अनेक लाभार्थी वंचित असल्याने त्यांना लवकर निधी मिळवून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी सूचना या बैठकीत करण्यात आली. वारंवार खंडित होणाºया बीएसएनएल दूरध्वनी व इंटरनेट सेवेबद्दल नागरिकांनी तक्र ार केली. तसेच बीएसएनएलच्या जमिनीखालून जाणाºया आॅप्टिकल फायबर केबल केवळ दोन ते अडीच फुटाखालून टाकल्या जात आहेत. त्या केबल पाच फूट जमिनीखालून टाकण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. सुधागड तालुक्यासाठी बीएसएनएलचा प्रभारी अधिकारी असून कामकाज सुरळीतपणे पार पाडून नागरिकांना सातत्यपूर्ण सेवा मिळण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात यावा अशी मागणी केली.या बैठकीस सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष राजेश मपारा, पाली-सुधागड पंचायत समितीच्या सभापती साक्षी दिघे, पाली सुधागड तहसीलदार बी.एन.निंबाळकर, नायब तहसीलदार वैशाली काकडे आदिंसह जांभुळपाडा सरपंच गणेश कानडे, लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा लता कळंबे, रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे, राजेंद्र गांधी तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.‘त्या’ महिलेचामृत्यू नैसर्गिकयावेळी सुधागड तालुक्यात काही महिनाभरापूर्वी झालेल्या वृध्द महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी विषय चर्चेत आला असता पोलीस उपनिरीक्षक एन.डी.चव्हाण यांनी यावर खुलासा केला. ते म्हणाले की, या महिलेवर बलात्कार अथवा खून झाला नसून तिचा नैसर्गिक मृत्यू झाला असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.यावेळी लता कळंबे यांनी जांभुळपाडा धोकादायक पुलाच्या दुरु स्तीकामी होत असलेल्या दिरंगाईबाबत प्रश्न उपस्थित केला.या बैठकीत विविध विभागाशी निगडित विषयांवर विस्तृत चर्चा होवून प्रश्न व समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने या महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि जनतेने योग्य समन्वय साधून काम करून सुधागड तालुक्याचा विकासाचा स्थर उंचावण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे. प्रशासकीय अधिकाºयांनी लोकसेवकांच्या दबावतंत्राखाली काम न करता लोकाभिमुख व पारदर्शक कारभार करण्याच्या दृष्टीने काम करावे.- राजेश मपारा, अध्यक्ष, सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती

टॅग्स :Raigadरायगड