शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या नशिबी ‘पडघे’च

By admin | Updated: July 10, 2015 00:22 IST

कोणत्याही परिस्थितीत जून महिन्यापर्यंत पडघे येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाकरिता पर्यायी जागा मिळवून देऊ, असे आश्वासन आदिवासी विकासमंत्र्यांनी दिले होते

पनवेल : कोणत्याही परिस्थितीत जून महिन्यापर्यंत पडघे येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाकरिता पर्यायी जागा मिळवून देऊ, असे आश्वासन आदिवासी विकासमंत्र्यांनी दिले होते. मात्र जून महिना उलटला तरी आश्वासनपूर्ती न झाल्याने ते हवेतच विरले की काय, अशा प्रश्न आदिवासी मुलांकडून विचारण्यात येत आहे.पडघेतील वसतिगृहाला पाचशे विद्यार्थ्यांची मान्यता असल्याने त्याकरिता मोठ्या जागेची गरज आहे. त्यामुळे २०१० साली पडघे-कोळीवाडा येथे एकूण ९ हजार चौरस फूट जागेवर आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू करण्यात आले. पडघे येथील वसतिगृहात प्रशस्त खोल्या, चोवीस तास पाणी, मोकळी हवा या सर्व पोषक गोष्टी आहेत. मात्र हे ठिकाण पनवेलपासून दूर पडते. शिवाय वाहतुकीसाठी गैरसोयीचे आणि आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी वसतिगृह दुसऱ्या ठिकाणी हलविण्याची तयारी प्रकल्प अधिकाऱ्यांनी एक वर्षापूर्वीच केली आहे. विद्यार्थ्यांकडूनही तशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत आहे. तत्कालीन गृहपालांनी विद्यार्थी प्रतिनिधींना बरोबर घेऊन कामोठे, खारघर, आकुर्ली, पनवेल, करंजाडे या ठिकाणी इमारती पाहिल्या. मात्र शासकीय वसतिगृह असल्याने अनेकांनी जागा देण्यास नकार दिला. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी जूनमध्ये वसतिगृह नवीन जागेत शिफ्ट होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र त्याची पूर्तता न झाल्याने पुन्हा आंदोलन होण्याचे चिन्ह आहे.