शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी आॅनलाइन; शिक्षक आॅफलाइन

By admin | Updated: July 10, 2015 21:54 IST

विद्यार्थी, शाळा आणि शिक्षक या सर्वांची माहिती आता एका क्लिकवर आॅनलाइन करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. या संदर्भात मुरुड तालुक्यातील ८० शिक्षकांचे प्रशिक्षण

मुरुड : विद्यार्थी, शाळा आणि शिक्षक या सर्वांची माहिती आता एका क्लिकवर आॅनलाइन करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. या संदर्भात मुरुड तालुक्यातील ८० शिक्षकांचे प्रशिक्षण गटशिक्षणाधिकारी बापूसाहेब सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर एस. ए. हायस्कूल मुरुड येथे आयोजित करण्यात आले.विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक युनिक आयडीशी जोडून त्यांची कौटुंबिक माहिती, जन्मतारीख, धर्म, जात, अभ्यासक्रमातील प्रगतीचा आलेख, त्यांचे छंद, आवडीनिवडी, कल या सर्व बाबी पेपरलेस होण्यासाठी आॅनलाइन प्रदर्शित करण्याचा शासनाचा मानस आहे. यामध्ये विद्यार्थी शिकत असलेली इमारत, स्थापना वर्ष, क्रीडांगण आदी दहा मानके, विषय शिक्षक या सर्व बाबींचा तपशीलवार समावेश असल्याने पालकांना आपला पाल्य कोणत्या स्थानावर आहे, हे आॅनलाइन कळणार आहे.यासाठी प्रत्येक शाळेची संपूर्ण आॅनलाइन माहिती भरण्याचे काम मात्र शिक्षकांनाच करावे लागणार असल्याने त्यांच्या मूळ अध्यापन कार्याला बगल देऊन १५ आॅगस्टपर्यंत हे तांत्रिक विभाग पूर्ण करणे अनिवार्य आहे. माध्यमिक शाळेत ही जबाबदारी संबंधित शाळेतील शिक्षकांना ही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सदरहू आॅनलाइन माहिती भरताना अध्यापन कार्यात खंड पडणार आहे हे निर्विवाद. परिणामी विद्यार्थी वाऱ्यावर सोडले जाणार का? अशी साधार भीती व्यक्त होत आहे.प्रत्येक शाळेतील संगणकाची उपलब्धी, डोंगराळ भागात मिळणारी इंटरनेट सेवा, विजेचा लपंडाव, भारनियमन या सर्व बाबींवर मात करून शिक्षकवर्गाला हे काम विनातक्रार करावे लागणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणादरम्यान नाराजी लपून राहिलेली नाही. सदरहू कामासाठी गटस्तरावर किंवा समूहस्तरावर शिक्षकांव्यतिरिक्त एखाद्या प्रशिक्षित तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करावी, अशी मागणी शिक्षकांमधून होताना दिसून आली.